नवी दिल्ली: सध्या जगभरातील परिस्थितीवर ओझरती जरी नजर टाकायचं ठरवलं तरी सगळीकडेच सध्या भौगोलिक सीमावाद, स्थानिक विरुद्ध परदेशी असा संघर्ष तर काही ठिकाणी जातीय विषयावरून समाजासमाजमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता पाहायला मिळते. अशा वातावरणात मला जर एक चांगलं, अर्थपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर मी कोणत्या देशाला पसंती द्यायला हवी..?
अर्थातच चांगलं आणि अर्थपूर्ण जगण्याची प्रत्येकाचीच स्वतःची एक वेगळी व्याख्या असते. अनेकांना ज्या देशाचा जीडीपी चांगला तो देश राहण्यायोग्य वाटत असेल. तर कोणाला ज्या देशात धार्मिक कलह नाही जो विवेकी विचारांचा आहे असा देश राहण्यायोग्य वाटू शकेल. भारतातल्या लोकांना विचारल्यास ते अर्थातच म्हणतील की.. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा..!
पण याचं शास्त्रशुद्ध मोजमाप जेव्हा होतं.. म्हणजेच एखादं जागतिक स्तरावरचं संशोधन जेव्हा भाष्य करतं तेव्हा मात्र तो अभ्यास नेमका काय आणि कसा झाला असेल हे तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेलच ना..? नामांकित अशा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी जगभरातील विविध खंडातील २२ देशांचा अभ्यास केला आहे. यामध्ये जवळपास २ लाख लोकांनी आपलं मत मांडलं आहे. त्यातून कोणता देश हा अर्थपूर्ण आणि चांगल्या जीवनशैलीसाठी अधिक चांगला आहे याबाबत सांगण्यात आले आहे.
हे संशोधन कोणते निकष लावून केले? जगभरात संघर्षाचे वातावरण असताना लोकांच्या चांगल्या आयुष्याच्या अपेक्षा काय आहेत? कोणता देश त्यांच्या मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांना अधिक चांगला वाटतो? आणि का? भारत देश या जगाच्या यादीत कुठे आहे? हार्वर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ काय म्हणतात हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या लेखातून...