Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?

Future of AI and Social Stability : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि शाश्वत विकास (Sustainability) यांच्यातील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारा लेख. एआयमुळे व्यवसाय वाढले आणि तंत्रज्ञान वेगवान झाले, तरी मानवी रोजगार आणि पर्यावरणावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा सखोल वेध.
AI and Sustainability History

AI and Sustainability History

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com

‘एआय’चा फायदा सर्वांना मिळेल का? शाश्‍वत विकासाची व्याख्या ही बऱ्याच वेळा पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट्स (मानव, पृथ्वी आणि व्यापार) या तिन्हींचा सर्वांगीण विकास अशी केली जाते, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे माणसाच्या सर्वांगीण विकासाऐवजी जॉब लॉसेसमुळे अस्थिरता येऊन अराजकता माजण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ‘एआय’मुळे बिझनेसला फायदा झाला तरी माणसांसाठी त्याचे दूरगामी परिणाम वाईट असू शकतात.

जगामध्ये आज दोन मोठे विषय सर्वाधिक चर्चेत आहेत... एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ‘एआय’ आणि दुसरा म्हणजे सस्टेनेबिलिटी, म्हणजेच शाश्वत विकास. पहिला विषय जगाला अधिक वेगवान, हुशार आणि ऑटोमेटेड बनवतो आहे; तर दुसरा विषय जगाला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. सुरुवातीला हे दोन्ही विषय वेगळे वाटतात. पण गेल्या काही वर्षांत लक्षात आलं की ‘एआय’ आणि सस्टेनेबिलिटी यांचं अतिशय खोल नातं आहे. योग्य प्रकारे वापरला तर ‘एआय’ पृथ्वी वाचवण्यास मदत करू शकतो; पण चुकीच्या पद्धतीनं वापरला तर तो पर्यावरणावर प्रचंड ताणही आणू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com