पुणे: भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ३५.५ टक्के लोक म्हणजेच साधारण ३१ कोटी ५० लाख लोक हे उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. २०१६ मध्ये २८.१ टक्के मृत्यू हे हृदयरोगामुळे झाले आहेत. त्यामुळेच आहारात मिठाचा वापर कमी करणे आणि आता खात असलेल्या मीठाऐवजी पर्यायी मीठ खाणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत नवीन मागर्दर्शक तत्व जाहीर केली असून यामध्ये त्यांनी सोडियम ऐवजी पोटॅशियम क्लोराइडयुक्त मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये नेमकं काय म्हंटलं आहे..? याविषयी आरोग्य संघटनेकडून काही संशोधन करण्यात आले आहे का? पण पॅकेज फूडमध्ये याचा समावेश करणे आव्हानात्मक का असू शकते..? जाणून घेऊया सोप्या शब्दांमध्ये..