

Student Physical Inactivity Solutions
esakal
मंदावलेल्या शारीरिक हालचाली ही समस्या गंभीर होत चालली आहे. आधुनिक जीवनशैली, ‘स्क्रीन-टाइम’मध्ये झालेली वाढ, शहरीकरण आणि मैदानांचा अभाव ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. शाळा, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना सक्रिय, निरोगी आणि सक्षम बनवणे ही आजची गरज आहे.
विद्यार्थ्यांतील ‘शारीरिक निष्क्रियता’ ही जगातील एक गंभीर सार्वजनिक आरोग्यसमस्या बनली आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार, जगात ८० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी दररोज आवश्यक असलेल्या ६० मिनिटांच्या शारीरिक क्रियाशीलतेचा निकष पूर्ण करत नाहीत. आधुनिक जीवनशैली, ‘स्क्रीन-टाइम’मध्ये झालेली वाढ, शहरीकरण आणि सुरक्षित खेळण्याच्या मैदानांचा अभाव यामुळे ही समस्या गंभीर होत आहे.