

Inflation vs Income
esakal
डॉ. अनिल पडोशी, अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक
impact of inflation on different income groups India analysis : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्या आहेत. भारत सोडून इतर सर्व देशांमध्ये तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाच्या किंमतीचा परिणाम सर्वत्र होऊन भारतात महागाई वाढणार, पण किती वाढणार ते सांगणे अवघड आहे. किंमतवाढ (महागाई) ज्या निर्देशांकाने मोजतात तो निर्देशांक भारतात २०२४ मध्ये १०० होता, तो जानेवारी, २६ मध्ये १०२.७४ झाला. (दोन वर्षात पावणे तीन टक्के महागाई वाढली) तर फेब्रुवारीमध्ये १०२.७४ वरून १०३.२१ झाला. (२०२४-२६ मध्ये केवळ तीन टक्के महागाईमध्ये वाढ) यानंतर मात्र महाग तेलामुळे महागाईमध्ये मोठी वाढ होणे शक्य आहे. परंतु, किंमतवाढीचे / महागाईचे स्पष्टीकरण करून त्यांवर उपाय सुचविणे हा या लेखाचा हेतू नाही. तर वाढत्या महागाईचा चटका किंेवा झळ कोणांस कमी किंवा जास्त बसू शकेल, याचा अभ्यास या लेखात केला आहे.