
डॉ. सदानंद मोरे
अलास्कातील सर्वोच्च ‘डेनाली’ शिखराला १८९६मध्ये सुवर्णचलनवादी राष्ट्राध्यक्ष मॅकेन्लीचे नाव देण्यात आले. ओबामांनी २०१५मध्ये स्थानिकांच्या मागणीनुसार पूर्वनाव ‘डेनाली’ बहाल केले. ट्रम्पने मात्र निवडणुकीत विजयानंतर ओहिओचा सन्मान राखत पुन्हा ‘मॅकेन्ली’ हेच नामाभिधान परत आणले.
अमेरिकेच्या विस्तारवादी आणि वर्चस्ववादी धोरणाची चिकित्सा आणि चिरफाड करण्यासाठी सरसावलेल्या अभ्यासक, विचारवंत, पत्रकारांमध्ये मार्क ट्वेन सर्वांत महत्त्वाचा ठरतो, याचे कारण त्याने या प्रश्नाचा सखोल, सर्वांगीण आणि गांभीर्यपूर्वक विचार केला होता. त्याची शैली औपरोधिक असल्यामुळे त्याच्या लेखनाचे गांभीर्य कदाचित काहीसे झाकोळले गेले असेलही; पण त्यामुळे फार फरक पडत नाही.