दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती अशी दोन महत्वाची संविधानिक पदे भूषविणारे जगदीश धनखड यांच्या विरोधात सध्या संसदेत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. देशाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे आणि विरोधकांचे मतभेत सर्वश्रुत आहेत मात्र आता त्यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यापर्यंत विरोधक का आक्रमक झालेत? कोण आहेत जगदीप धनखड? त्यांची पार्श्वभूमी काय? अविश्वासाचा प्रस्तावाची तयारी असली तरी तेवढी पक्षीय ताकद त्यांच्याकडे आहे का? हा एकूणच विषय काय आहे समजून घेऊया सोप्या भाषेत.