
Punjab flood politics
esakal
जयदीप पाठकजी
गेल्या अनेक दशकांतील सर्वांत भीषण पुराचा सामना करीत असलेल्या पंजाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट देऊन मदतीच्या ‘पॅकेज’ची घोषणा केली. पुराने उद्ध्वस्त झालेल्या पंजाबला भेट देण्यास पंतप्रधानांनी विलंब केल्याची टीका त्यांच्यावर झालीच शिवाय मदतीसाठी दिलेले १६०० कोटी रुपयांचे पॅकेजही अपुरे असल्याचेही आम आदमी पक्षाने म्हटले आहे. पंजाबमधील पूर, मोदींचा दौरा आणि त्यानिमित्ताने रंगलेल्या राजकारणाबद्दल...
एक सधन, समृद्ध आणि ‘हरित क्रांती’ची प्रयोगशाळा असलेल्या पंजाबचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते नंतरच्या अनेक दशकांत पंजाबमध्ये जे घडले त्याची दखल देशासह जगाने घेतली. वेळोवेळी संरक्षण, शेती, औद्योगिक उत्पादने आदी क्षेत्रांमध्ये पंजाबने कायमच देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता याच पंजाबमध्ये आलेला पूर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.