
west indies cricket decline
esakal
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
वेस्ट इंडीज संघाच्या क्रिकेटपटूंची खेळण्याची शैली जबरदस्त होती. आक्रमक क्रिकेट खेळण्यासोबत त्यांचा मैदान आणि मैदानाबाहेरचा वावर भुरळ पाडत असे. अलीकडच्या काळात मात्र विंडीज संघ माझ्या डोळ्यासमोर खाली जाताना बघायला मिळाला, त्यामुळेच म्हणावे लागते कोण होतास तू, काय झालास तू!
महाराष्ट्राचा तरुण क्रिकेट संघ १९८४ मध्ये मिलिंद गुंजाळच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पहिला परदेश दौरा आणि तोसुद्धा इंग्लंडला म्हटल्यावर मन हरखून गेले होते. क्रिकेट सामने खेळून अनुभव घेण्याबरोबर त्या दौऱ्यात अजूनही काही गोष्टींचा आनंद घेता आला होता. इंग्लंड फिरण्यापेक्षा सर्वात जास्त आनंद लॉर्ड्स मैदानावर जाऊन कसोटी सामना बघण्याचा मिळाला होता. महाराष्ट्राचे माजी फलंदाज मधू गुप्ते यांनी माझ्यासोबत माझे जवळचे मित्र प्रकाश वाकणकर आणि प्रसाद प्रधान यांना लॉर्ड्स मैदानावर जाऊन कसोटी सामना बघायला तिकीट दिले होते.