मुंबई: छ्या..! रेंजच नाही राव.. कधीकाळी गावाकडे किंवा छोट्या शहरात गेल्यावर तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? अनेकदा नेटवर्क नसण्यापायी 'वर्क फ्रॉम होम' ची सुविधा असूनही आपल्यातील अनेक जण हे निवांत गावी जाऊन काम करू शकत नाही कारण त्यांना अनेकदा नेटवर्कच्या अडचणींचा सामना करावा लागतो.
पण आता भारतातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी छोट्या किंवा 'टीअर २' शहरांमधील नेटवर्क सुधारण्यावर भर दिला आहे. पण कंपन्या अचानकपणे या छोट्या शहरांकडे का लक्ष केंद्रित करत आहेत? त्यामागे काय कारण आहे? भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात? जाणून घेऊया.....