नीरज हातेकर
saptrang@esakal.com
केंद्र सरकारने नुकतीच येत्या जनगणनेत जातीवार आकडेवारी गोळा करण्याचे जाहीर केले आहे. २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते, पण कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ते होऊ शकले नाही. या आधीची जनगणना २०११ मध्ये म्हणजे १५ वर्षांपूर्वी झाली. मधल्या पंधरा वर्षांत जनगणना नसल्यामुळे आपल्या देशाबद्दल अनेक मूलभूत आणि महत्त्वाची आकडेवारी, उदा. लोकसंख्या, साक्षरता, जन्मदर, मृत्युदर, शहरीकरण, रोजगाराचे स्वरूप वगैरे उपलब्ध नव्हती. बहुतेक वेळा सरकारी धोरण २०११ च्या जुन्या आकडेवारीवर अवलंबून होते.