
Guar gum uses
esakal
डॉ. अनिल लचके
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गवारीचा दबदबा वाढत चालला आहे, तो त्यातील पोषक गुणधर्मांमुळे. या गुणधर्मांची वैज्ञानिक माहिती देणारा लेख. गवारीच्या उत्तम वाणाची आणि बाजारपेठेची माहिती घेऊन उत्पादन केल्यास अर्थकारणही साधता येईल.
जेवणात जेव्हा गवारीची भाजी असते, तेव्हा तिचा मनमुक्तपणे आस्वाद घेणारे अनेक रसिक असतात. भात-वरणा बरोबर किंवा पोळी-भाकरीबरोबर गवारीची भाजी रुचकर लागते. भारतात गवार ही एक लोकप्रिय भाजी आहे. या भाजीचे मजेत सेवन करताना गवारीच्या आतील सात-आठ कप्यांमध्ये सुरक्षित असलेल्या छोट्या बीजांकडे आपले लक्षही नसते. गवार शेंगेसारखी दिसते म्हणून अशा बीजांना "क्लश्टर बीन्स" असं म्हणतात. वनस्पतीशास्त्रज्ञ गवारीला ‘स्यामॉपसिस टेट्रागोनोलोबा’ म्हणतात. स्यामो म्हणजे बीन प्रमाणे आणि ‘ऑप्सिस’ म्हणजे दिसणारे.