sports Mental healthE sakal
प्रीमियम आर्टिकल
Sports Psychology: पदक जिंकण्यासाठी फक्त फिटनेस असून उपयोग नाही, Mental Health तेवढीच महत्त्वाची | वाचा Case Study
Mental health of an Athlete: ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. त्याचं महत्त्व ऐकूया, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्टकडूनच
काही दिवसांपासून चौदा वर्षांचा प्रणव हा उभरता खेळाडू सरावाला जायला अळमटळम करू लागला. एक महत्त्वाची स्पर्धा तोंडावर आली तरीही त्याचं सरावात लक्ष नव्हतं. तो गोष्टी विसरत होता. असं का होतंय, याचं उत्तर कोणालाच सापडत नव्हतं.
खरंतर प्रणवकडे सगळं होतं, उत्तम प्रशिक्षक, सुजाण पालक, आर्थिक क्षमता, प्रायोजक पण त्याचाच त्याला ताण येऊ लागला होता. त्याचं प्रतिबिंब त्याच्या कामगिरीत दिसत होतं. वेळेवर प्रणवला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञांची मदत मिळाली, त्याचं करिअर पुढे गेलं.
पण असे अनेक प्रणव आणि त्यांचे पालक आजही नेमकं काय चुकतंय याचं उत्तर शोधत राहिलेले असतात, कारण खेळात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मनाची तंदुरुस्ती आवश्यक असते, हेच त्यांना लक्षात येत नाही.