
मुरलीधर कराळे
पुणे, छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेला अहिल्यानगर जिल्हा. एक विमानतळ, पाच रेल्वे स्थानके, १४ तालुक्यांची १४ बस स्थानके; तसेच अहिल्यानगर शहरातील तीन प्रमुख बसस्थानके अशी सार्वजनिक स्थिती आहे. जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक अनेकदा सुरळीत असली, तरी पुणे-अहिल्यानगर हा प्रवास अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. कायमच वाहतुकीची कोंडी आणि लागणारा वेळ यामुळे प्रवासी त्रस्त होत असतात.