
Qatar Israel attack
esakal
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
कतार हा अमेरिकेचा मध्य पूर्वेतील सर्वांत जवळचा मित्र देश आहे. या देशात अमेरिकेचा सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. अलीकडेच कतारनं डोनाल्ड ट्रम्प यांना अब्जावधी किमतीचं विमान भेट दिलं होतं. या सगळ्या अमेरिका विषयाच्या सदिच्छा, अमेरिकेला खूश ठेवण्याच्या कसरतींची अमेरिका इस्राईल संबंधांपुढं किंमत शून्य आहे, हे हल्ल्यानं अधोरेखित केलं.
‘अ मेरिकेचा दुश्मन असणं धोकादायक आहे, मात्र अमेरिकेचा मित्र असणं जीवघेणं ठरू शकतं,’ हे विधान हेन्री किसिंजर यांचं म्हणून सांगितलं जातं. त्यांनी ते कधी नाकारलं नाही, स्वीकारलंही नाही. त्याची आठवण निघते आहे ती इस्राईलच्या कतारमधील हल्ल्यानंतर. अमेरिकेच्या तमाम मित्र असलेल्या अरब राष्ट्रांना अमेरिकी सुरक्षा हमीचा पोकळपणा जाणवू लागला. त्यावरचा उतारा म्हणून मुस्लिम किंवा अरब नाटो असं एकत्रित प्रतिकार करणारं सैन्य उभं करण्याची कल्पना पुढे आली. जी अरब देशांसाठी सध्या तरी फॅन्टसीशिवाय अधिक काही नाही.