
भारतापासून भले अंतर लांब असेल पण कॅनडातील राजकारणावर भारतात चर्चा होतात. विशेषत: कॅनडात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांचं प्रमाण वाढल्यावर तर या चर्चांना अधिकच रंग आला आहे.
त्यामुळेच सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पायउतार होण्याचं सूतोवाच करताच भारतीय माध्यमांतही याची चर्चा सुरू झाली. ट्रुडोंनी सत्ताधारी ‘लिबरल पार्टी’चं नेतेपद सोडलं आणि पंतप्रधानपदाचाही राजीनामा देणार असल्याचं सांगितलं.
यानंतर नेमकं काय होणार? ट्रुडो गेल्यानंतर पंतप्रधानपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
आगामी सरकार भारतासाठी फायद्याचं असेल की तोटयाचं?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ट्रुडो यांच्या राजीनाम्यामागे भारताशी बिघडलेले संबंध हे कारण आहे का?
त्यांनी राजीनामा मुळात दिला तरी का?
असे अनेक प्रश्न असतील त्याच्याच सविस्तर उत्तरांसाठी वाचा, 'सकाळ प्लस'चा हा लेख.