तुम्ही सजग पालक आहात पण एक दिवस तुम्हाला कळलं की तुमच्या मुलाने चोरी केलीय. काय प्रतिक्रिया असेल तुमची? माराल, ओरडाल की स्वत:लाच दोष द्याल?पालक म्हणून अनेक कठीण प्रसंग येतात पण चोरीसारख्या गोष्टी कशा हाताळाल?त्यासाठीच वाचा, सकाळ प्लसचा हा लेख .''माझ्या दहा वर्षांच्या मुलाने आजीच्या नकळत तिच्या पाकीटातले ५०० रुपये काढून घेतलेत आणि शाळेतल्या एका मुलाकडून गेम घेतलाय. आई म्हणून मला कळत नाहीये याला ओरडू, मारू की काय करू? अजून त्याच्या आजीला आणि बाबाला हे माहिती नाहीये. त्यांना कसं सांगू?''एका महिलेने सोशल मीडियावरच्या एका ग्रूपमध्ये ही कैफियत मांडली होती. त्याला अनेकींनी अनेक प्रकारे उत्तरही दिलं होतं. पण साधारण १०-१५ वर्षांपूर्वी अशा तक्रारींवर हमखास सुचवला जाणारा हाताला चटका वगैरे देण्याचा उपाय मात्र कुणी सुचवला नव्हता, हे सुदैवच. पालक सजग होतायत खरं पण अजूनही हे असे विषय कसे हाताळावे हे पटकन समजत नाहीये. .premium I Parenting Teenagers Money: ''माझ्या मुलाला पैशाची किंमतच नाही!'', असं आईबाबा का म्हणतात?.दरवेळी मुलांनी काहीतरी घेतलं की ती चोरी असते का, त्यांना अमुक ती चोरी आणि तमुक तो तुझा बालहट्ट असा फरक कसा सांगायचा आणि समजावायचा? पालक म्हणून करायचं काय?हेच समजून घेऊया या ५ मुद्द्यांमधून.१.संपूर्ण घटना समजून घ्या तुमचं मूल तुमच्या पाकीटातून पैसे घेत आहे असा संशय आला तर आधी त्याची शहानिशा करा. खरोखरच मूल असं करतंय की तुम्हीच नजरचुकीने पैसे इकडे तिकडे ठेवले ते आधी शोधा. मूल पैशांसोबत दुकानातून पैसे न देता वस्तू लंपास करत आहे का, इतर दोस्तांच्या वस्तू सहज उचलून आणत आहे का, याकडे लक्ष द्या. तुम्ही मुलांना ते लक्षात आणून दिल्यावर मुलांची प्रतिक्रिया काय आहे, ते पाहा. मुलाने असं का केलं ते पाहा. त्याने नेमकं असं का केलं हे त्याला किंवा तिला विचारा. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे वर्तन बऱ्याच मुलांमध्ये दिसतं. अर्था ते वेळीच रोखायला हवं. .Premium| Single Parents Finance: एकल मातांनी आर्थिक नियोजन कसे करावे?.२. मुलाचं वय किती आहे ते पाहाआधी तुमच्या मुलीचं वा मुलाचं वय किती आहे ते पाहा. चार किंवा पाच वर्षांखालील मुलांना अनेकदा योग्य-अयोग्य यातला फरक कळत नाही. वस्तू घेण्यामागे चोरीचा हेतू नसतो. ६-१३ वयोगटांतल्या मुलांना बरोबर-चूक कळतं किंवा अमुक ते आपलं तमुक दुसऱ्याचं इतकंही कळतं पण कधीकधी ते सहज असं करून जातात. त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा हेतू समजून घ्या.१४ वर्षांवरील मूल मात्र चोरी करत असेल तर त्याकडे जरा काळजीची गोष्ट आहे. मुलाशी संवाद साधा. .FOMO Parenting: तुमच्या मुलांच्या भविष्याचे निर्णय तुम्ही आजूबाजूच्या पालकांकडे बघून घेता..?.३. कारण शोधामुलं चोरी का करतात, याचं कारण शोधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी लहान मुलांना कळत नाही. एखादी गोष्ट आवडली म्हणून ती घ्यायची इतकंच त्यांना कळतं. हे दुसऱ्याचं ते आपलं इतकं त्यांना कळत नाही. थोड्या कळत्या वयातली मुलं कधीकधी आततायीपणे पैसे हवेत म्हणून चोरतात. आपल्या समवयस्कांकडे पैसे आहेत आणि आपल्याकडे नाहीत या न्यूनगंडापायी किंवा समवयस्कांचा दबाव, हवी ती गोष्ट खरेदी करण्यासाठी खिशात पैसे नसतील तर ते हवे असणं. पालकांकडून पैसे मागता न येणं या कारणापायी मुलं पैसे चोरतात.मोठी मुलं पैसे चोरत असतील तर शिस्त लावण्यासाठी मारझोड करण्यापेक्षा त्यांच्याशी बोला. कधीकधी मुलामुलांमध्ये चित्रविचित्र पैजा लागतात. त्या पैजेच्या नादात मुलं चोरीसारख्या चुकीच्या गोष्टी करू शकतात. कधी मुलांना इतर मुलं त्रास देत असतात. बुलिंगचा एक भाग म्हणून भलते चॅलेंज दिले जातात. त्याचा भाग म्हणून चोरी केली जाते.काहीवेळा मुलं भावनिकदृष्ट्या असुरक्षित असतात. त्यांना काही करून लक्ष वेधून घ्यायचं असतं. कधीकधी मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्याही असू शकतात. त्यासाठी त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार द्या. समुपदेशन घ्या.सविस्तर बोला..क्लेप्टोमेनिया (kleptomania) या आजाराबद्दल तुम्ही वाचलं असेलच. काहीजणांना वस्तू लंपास करण्याची तीव्र इच्छा होते आणि ती रोखू न शकल्याने ते चोरी करतात. आपल्या मुलाला हा आजार तर नाही ना, याचीही नीट चौकशी करा. .४. प्रतिक्रिया महत्त्वाचीमुलांनी काहीही केल्यानंतर पालक म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया देता, हे महत्त्वाचं आहे. पटकन रागावू नका किंवा मुलाला टाकून बोलू नका. कठोर शिक्षा, मारहाण तर बिलकुल करू नका. अगदीच तुम्ही मुलांना रंगेहाथ पकडलं किंवा वारंवार मूल तेच करत असेल तर ओरडणं चालेल.सगळ्यात आधी मुलाला समजावून सांगा की, चोरी करणं म्हणजे काय? आपल्याला हवी म्हणून एखादी गोष्ट घेणं आणि तीच गोष्ट न विचारता घेणं यातला फरक समजवा. असं वागणं का चुकीचं आहे, त्याचं कारण मुलांना पटवून द्या. त्यामुळे मित्र, जवळच्या व्यक्ती दुरावतील, सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, यासारखे परिणाम समजावून सांगा.मुलाने चोरी केलेली गोष्ट त्यांच्यासोबत जाऊन मूळ मालकाला परत करा आणि माफी मागा. मुलाकडून पुन्हा असं होणार नाही यां आश्वासन घ्या. लगेच मुलावर अविश्वास दाखवू नका. मुलांना सुधारण्याची संधी द्या. शिक्षा जरूर करा पण ती सकारात्मक असू दे. उदा. अमुक एखादी रक्कम घेतल्याबद्दल भरपाई म्हणून दररोज घरातील एखादे ठराविक काम करणे. जबाबदारी पार पाडणे.एकदा मुलाने चोरी करण्याची चूक केली म्हणून ती परत परत उगाळून दाखवू नका. त्याच्या कपाळावर कायम चोरीचा शिक्का मारू नका.मुलांनी इतरांच्या कह्यात येऊन चोरी केली असेल, दुसरी मुलं आपल्या मुलाला धाकदपटशा दाखवून असं करायला भाग पाडत असतील तर त्याविरोधात उभे राहा. हुशारीने त्यातून मार्ग काढा पण आपल्या मुलाचा हात मात्र सोडू नका..Premium: Parental stress: पालकत्त्वाचा ताण जीवावर बेततो आहे का? तो कसा हाताळायचा?.५. सावध राहामुलाने चूक केल्यानंतर त्यांच्यावर विश्वास जरूर ठेवा पण सावध राहा. मूल पुन्हा पुन्हा हे करत नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून पाहा. परत मूल असं वागत असेल तर वेळीच फटकारा. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या. मुलाला खर्चासाठी अधिक पैसे लागत असतील तर ते मोकळेपणाने समजून घ्या. आवश्यक त्या खर्चांना मुद्दाम कात्री लावू नका..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.