

Cheaper Medical Costs Drive NRIs to Indian Health Insurance Plans
E sakal
From Gulf to US: Why NRIs Prefer India for Health Coverage.
अनुराग अमेरिकेत राहतो पण त्याने आरोग्य विमा मात्र भारतातला घेतलाय. अनुरागसारखे अनेकजण आहेत. अनिवासी भारतीयांनी अर्थात NRIनी भारतात हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. पॉलिसीबाजार या वेबसाइटने ताजा अहवाल सादर केलाय. त्यात दिसतंय की जानेवारी २०२६पर्यंतच्या आकडेवारीनुसार वर्षागणिक १२६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेलीय. हेल्थ पर्यटनाचा हा नवाच दृष्टीकोन या निमित्ताने समोर येतो आहे. याचं कारण कंपनीच्या पॉलिसीमध्ये आहे की भारतातील वैद्यकीय अर्थव्यवस्थेत? विषय समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.
पॉलिसीबाजाराने २०२६जानेवारीपर्यंतची आकडेवारी जाहीर केलीय. त्या आकडेवारीनुसार एनआरआयच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट समोर येतेय.
परदेशात राहणाऱ्या अनेक भारतीयांनी भारतात आरोग्य विमा उतरवलेला आहे. पॉलिसीबाजारच्या आकडेवारीनुसार फॅमिली फ्लोटर आणि पालकांसाठीच्या कव्हरेज पॉलिसींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मात्र वैयक्तिक आरोग्य विमा योजनांमध्ये ६ टक्क्यांची घट झाली आहे. फॅमिली फ्लोटर पॉलिसींचा वाटा २० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पालकांसाठी घेतलेल्या पॉलिसींचा वाटा वर्षागणिक ३२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत गेला आहे.