Premium|Financial Fraud with Seniors: आर्थिक फसवणुकीचे सॉफ्ट टार्गेट ज्येष्ठ नागरिकच का असतात..?

Senior Citizen scam : फसवणुकीसाठी हे लोक ज्येष्ठ नागरिकांची निवडच का करतात, त्या निवडीमागे या फसवणूक करणाऱ्यांचा काय विचार असतो, ज्येष्ठ नागरिक याला बळी का पडतात, आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया सकाळ+ च्या माध्यमातून..
financial scams with senior citizens

financial scams with senior citizens

Esakal

Updated on

पुणे - अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एका व्हिडिओत सांगतायेत.. एक चार पाच दिवसांपूर्वी मला मेसेज आला की तुमच्या गॅस कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय ते कनेक्शन आज संध्याकाळी कट करण्यात येईल. ते कट करायचे नसेल तर लगेच बिल भरा... पण मी बिल भरलंय असं ऐश्वर्या यांनी सांगितल्यावर आम्ही डिजिटायजेशन करतोय तुम्हाला परत भरावं लागेल असं सांगत एक फाईल पाठवली व त्यावर क्लिक करायला सांगितले. त्यांचा आयफोन असल्यामुळे ती फाईल उघडली नाही पण त्या व्यक्तीने एड्रॉईड फोनरुन उघडा असे सांगितले.. एव्हाना त्यांना कळालं की हा फ्रॉड कॉल होता....

केवळ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नाही तर केवळ मागच्या आठवड्यातील घटनांचा आढावा घेतला तर पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटींची फसवणूक झाली.  त्याआधी मुलुंडमधील एका व्यक्तीने स्वत:चा फ्लॅट विकून सव्वा कोटी समोरच्या व्यक्तीला दिले.

आता या आर्थिक फसवणुकीचे आकडे हे हजारात किंवा लाखात न रहाता कोटींमध्ये गेले आहेत. फक्त महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तरी दर दिवसाला एक मोठी आर्थिक फसवणूक होते आहे. आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला बळी पडतायेत ज्येष्ठ नागरिक..!

ही आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न प्रत्येकच वयोगटातील व्यक्तीसोबत होत असला तरी याला बळी पडणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे.

या आर्थिक फसवणुकीसाठी हे लोक ज्येष्ठ नागरिकांची निवडच का करतात, त्या निवडीमागे या फसवणूक करणाऱ्यांचा काय विचार असतो, ज्येष्ठ नागरिक याला बळी का पडतात, आकडेवारी काय सांगते आणि या सगळ्यात अडकायचे नसेल तर काय करायचे हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून.. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com