Sindhudurg tourismSakal
प्रीमियम आर्टिकल
सिंधुदुर्गला कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न अधुरं का?
गोव्यापेक्षा सुंदर समुद्रकिनारे असतानाही सिंधुदुर्गाचा पर्यटनविकास झाला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारील राज्य म्हणजे गोवा. हे राज्य केवळ आणि केवळ पर्यटनाच्या आधारावर देशात नाही,तर जगात नाव कमावून आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पनातील मोठा वाटा हा पर्यटनाचा आहे. एवढेच नव्हे तर पर्यटनाचे आता उद्योगनगरीत रुपांतर झाले आहे. मात्र गोव्याच्या लगत असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनात अजूनही मागासलेलाच राहिला आहे. सिंधुदुर्गाचा कॅलिफोर्निया होणार ही घोषणा आणि संकल्पना आता राजकीय लाटांमध्ये अडकली असून, ती कधीच विरली आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांपेक्षा सुंदर आणि स्वच्छ सागर किनारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री यांच्या अनास्थेमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही.