Impact of US import tariffs on Indian exports
esakal
सुनील चावके
‘सकाळ’च्या दिल्ली ब्यूरोचे प्रमुख
स न २०२५ मध्ये अमेरिकेने युरोपीय महासंघ, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, एल साल्वाडोर, अर्जेंटिना, इक्वेडोर, ग्वाटेमाला यांच्याशी व्यापार वाटाघाटी आणि करार केले आहेत. मात्र, त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत फेब्रुवारीपासून आतापर्यंत वॉशिंग्टन आणि दिल्लीत झालेल्या सहा औपचारिक फेऱ्यांनंतरही वाटाघाटीची चौकट निश्चित होऊनही अद्याप व्यापार करार झालेला नाही. तो हुलकावणी देतच आहे.