
पुणे: पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. त्यालाच आपण एक वर्ष म्हणतो. हे आपण लहानपणी शाळेत शिकलो आहोत. पण एका वर्षाला आपण बारा भागांमध्ये (महिन्यांमध्ये) विभागले आहे, त्याऐवजी आपण ३६ ते ३७ दिवसांचे दहा महिने सुद्धा करू शकतो. मग एका वर्षात बाराच महिने का असतात?
हा मोठा कुतुहल निर्माण करणारा प्रश्न आहे. वर्षामध्ये १२ महिने असण्यामागे चंद्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीचा महत्त्वाचा रोल आहे. चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला २९.५ दिवस लागतात.
या ३० दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी चंद्राचा आकार वेगवेगळा असतो. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना प्रत्येक दिवस इतर दिवसांपेक्षा कसा वेगळा आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी चंद्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग व्हायचा. चंद्र वर्षभरात स्वतःभोवती साधारणत: बारा फेऱ्या पूर्ण करतो म्हणूनच वर्षात बारा महिने असतात.