
शैलेश नागवेकर
shailesh.nagvekar@esakal.com
आयपीएल काही दिवसांसाठी स्थगित झालेली असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटीतील निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर शुभमन गिलची अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती होत असताना काही दिवस अगोदर इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी मुख्य संघ जाहीर करण्यात आला.
दोन्ही मिळून जवळपास ३८ खेळाडू निवडण्यात आले; पण त्यामध्ये १४ कसोटी खेळलेल्या आणि ३७ची सरासरी असलेल्या आणि विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला स्थान नव्हते. विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे मधली फळी रिक्त होत असताना आणि संघात रोहित शर्माचा अनुभवही पुढे मिळणार नसताना श्रेयसचा का विचार झाला नाही, असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे.