

Wisdom vs age
esakal
वयापेक्षा निर्णय किती योग्य घेतले त्यावर शहाणपण ठरतं. त्यामुळे अनुभव पाठीशी असल्यामुळे वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचे निर्णय योग्य ठरतात आणि म्हणून ते शहाणे ठरतात. परंतु, वय म्हणजे शहाणपण नाही. आपल्यापेक्षा वयाने छोटी व्यक्ती शहाणी असू शकते तसेच आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती मूर्ख असू शकते.
त्येक वयस्कर माणूस हा अनुभवी असेलच असं नाही. म्हणजे वयाचा आदर आपण केला पाहिजे हे मान्य आहे; पण वय वाढलं आहे म्हणून ती व्यक्ती हुशार असेलच असं काही नाही’... कारमध्ये बसल्या बसल्या माझी मैत्रीण अस्वस्थपणे बोलत होती. अशा वेळी आपण खूप कमी बोलायचं असतं एवढं भान आहे मला. ‘काय झालं?’ एवढंच मी म्हणालो आणि मी तेवढंच विचारावं ही तिची पण अपेक्षा असावी. ‘काही नाही रे, इन जनरल म्हणते आहे मी’ असं म्हणत, ती पुन्हा सुरू झाली. ‘सर्वसाधारणपणे वयस्कर व्यक्तीला उगाचच शहाणा समजलं जातं. काही जणांचं आयुष्य जातं; पण त्यांना शहाणपण कधी येत नाही. माझ्या मैत्रिणींच्या वडिलांना सतत कोणाला न कोणाला सल्ले द्यायचे असतात. बरं सल्ला ऐकून घ्यायला काही अडचण नाही; पण तो चांगला असला पाहिजे ना! तार्किक असला पाहिजे, योग्य असला पाहिजे... पण नाही. आपलंच खरं करायचं!’ रस्त्यावर गर्दी खूप असल्यामुळे मला तिच्याकडे बघता येत नव्हतं. माझं लक्ष कार चालवण्यावर होतं. मी समोर बघून कार चालवत चालवत तिला विचारलं, ‘काय म्हणाले ते नेमकं?’ ती माझ्याकडे बघत म्हणाली, ‘त्यांचं असं म्हणणं आहे, की वयाने मोठ्या माणसाला जास्त कळतं किंवा त्यांच्याकडे जास्त शहाणपण असतं. मला सांग, असं कसं असू शकतं?’