
मुंबई - मुंबईतील एक मोठी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते आणि या लोकसंख्येतील मोठा वाटा महिलांचा आहे. एकाअर्थाने मुंबई चालवणाऱ्या या स्त्रियांच्या हाती आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच काय लागतं याचा आढावा नुकताच एका सर्वेक्षणात घेण्यात आला.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS)ने मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील रहिवाश्यांचं एक सर्वेक्षण केलं. जून ते सप्टेंबर या काळात या रहिवाशांकडून ही प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात 12-24 वयोगटातील 1,275 मुली आणि महिला तसेच 15-24 वयोगटातील 584 मुले आणि पुरुष यांचा समावेश आहे.