Premium|Words and Meaning : शब्दांचे स्मशान... लफ्जों का कब्रस्तान...

Words, Meaning and Human Behaviour : शब्दांचा अर्थ माणसाच्या जगण्यात आणि वागण्यात उमटला नाही, तर ते शब्दकोशातच कैद राहतात. सच्चेपणा, निर्मळपणा यांसारख्या शब्दांच्या अस्तित्वावर आज प्रश्न निर्माण होतो.
Words, Meaning and Human Behaviour

Words, Meaning and Human Behaviour

esakal

Updated on

भीमराव पांचाळे - sakal.avtaran@gmail.com

शब्द, अल्फाज यांना त्यांच्या निहित अर्थासह माणसाने जर उपयोगात आणले नाहीत; तर ते त्यांच्या घरात म्हणजे शब्दकोषातच पडून राहतील. अशा परिस्थितीत शब्दांनी वाळवीचे भक्ष्य व्हावे, गुदमरून तिथेच मरावे की बंड करून उठावे? निश्चितच बंड करावे.

शब्दांचे स्मशान... लफ्जों का कब्रस्तान...

बाप रे, किती भयानक वाटते हे!

‘वाटते’ नाही, आहेच भयानक आणि वास्तवदेखील

हेच आहे.

शब्दांनाही माणसासारखेच असते जनन आणि मरणसुद्धा. भाषेच्या जन्माची अतिसंथ प्रक्रिया माणसाचे दैनंदिन जगणे आणि संवादाच्या गरजेशीच निगडित असते. प्रत्येक शब्दाला त्याचा एक निहित अर्थ असतो. त्या दडलेल्या अर्थाला वाचा देण्याचे काम त्या शब्दाचे असते. तो त्याला मिळत नाही याचा अर्थ माणसे अर्थाला जागत नाहीत, तशी वागत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com