

Role of World Economic Forum in global agenda setting
esakal
World Economic Forum (WEF) ही जागतिक पातळीवरील एक आगळीवेगळी संस्था आहे. ती संयुक्त राष्ट्रसंघासारखी औपचारिक आंतरराष्ट्रीय संस्था नाही, तसेच केवळ शैक्षणिक व्यासपीठही नाही. या मंचाला कायदे करण्याचा अधिकार नाही, करार लादण्याची शक्ती नाही आणि थेट लोकशाही अधिमान्यता देखील नाही. तरीसुद्धा, दरवर्षी या मंचावर होणाऱ्या चर्चांकडे जगभरातील सरकारे, बाजारपेठा आणि माध्यमांचे लक्ष वेधले जाते. याचे कारण समजून घ्यायचे असेल, तर केवळ ठिकाण किंवा व्यक्तींपेक्षा अधिक महत्त्व दिले पाहिजे ते म्हणजे या मंचावर घडणाऱ्या चर्चांचे स्वरूप आणि त्यातून आकाराला येणाऱ्या कल्पना.
मूळात, जागतिक आर्थिक मंच ही ‘अजेंडा ठरवणारी’ संस्था आहे. जगातील प्रभावशाली वर्गाने कोणत्या मुद्द्यांवर विचार करावा, त्या समस्यांकडे कशा दृष्टीने पाहावे आणि सध्याच्या राजकीय–आर्थिक मर्यादांमध्ये कोणते उपाय शक्य आहेत, हे ठरवण्यात या मंचाची भूमिका महत्त्वाची ठरते. आजच्या अनिश्चित, तुटक आणि वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेत ही भूमिका अधिक ठळक झाली आहे.