esakal | आपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज}

ओझोन वायूच्या थराची होत असलेली हानी थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ओझोनला हानिकारक अशी उत्पादनांचा वापर टाळणं आपल्या हातात आहे.

आपल्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सुर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांना वाचवण्याचं काम ओझोनचा थर करतो. मात्र पृथ्वीवर प्रदुषणामुळे या ओझोनच्या थराला हानी पोहोचत आहे. याच ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी प्रबोधनाच्या उद्देशाने जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनपेक्षा ओझोन गरजेचा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकी त्याची पृथ्वीतलावर सजीवांसाठी आवश्यकता आहे.

पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर आहे. त्यामुळे UV-A,B,C किरणे शोषली जातात. सजीवांसाठी अतिशय धोकादायक अशी ही अतिनील किरणे असतात. ओझोनच्या थराने ही किरणे रोखली नाहीत तर त्वचेचा कर्करोग आणि त्वचा जळण्याचा धोका असतो. पृथ्वीवर धडकणारी ही किरणे ओझोनच्या थरामुळे पुन्हा सूर्याकडे परतवली जातात. सूर्यावरून पृथ्वीवर तीन प्रकारची किरणे येतात. त्यात UV-A ही किरणे ओझोन थरातून आरपार जातात. तर UV-B या किरणांना ओझोन थर शोषून घेतो. याशिवाय UV-C ही किरणे सजीवांना अतिशय धोकादायक असतात. या किरणांना ओझोन थर परत पाठवत असतो.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

ओझोन वायू आणि थराचा शोध

ओझोन हा रेणूंचा एक थर आहे. त्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणु असतात आणि यामुळेच ओझोनचं रासायनिक सूत्र हे O3 असं लिहिलं जातं. जमिनीपासून ११ किलोमीटर ते ४० किलोमीटर उंचीवर वातावरणात ओझोनचा थर आढळतो. याला स्ट्रॅटोस्फियर असंही म्हटलं जातं.ओझोन वायूचा शोध हा १८४० मध्ये लागला. क्रिस्टियन फॅड्रिक स्कोएनबेन या जर्मन स्वीस रसायनशास्त्रज्ञाने लावला. त्यानंतर १९१३ मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्री बुइसन यांनी पृथ्वीवर ओझोन थराचा शोध लावला. त्यानंतर १९३० मध्ये सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर कसा तयार होतो हे शोधून काढलं. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनच्या थराचा क्षय होत असल्याचं समोर आलं आहे. याला नायट्रिक ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, क्लोरोफ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन यांच्या संयुगाने छिद्र पडत आहे. अंटार्क्टिका इथल्या ओझोनच्या थराला असं मोठं छिद्र असल्याचंही याआधी समोर आलं आहे.

पहिला ओझोन डे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ओझोन वायूच्या संवर्धनासाठी व दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी १९९४ मध्ये १६ सप्टेंबरला ‘ओझोन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार १९९५ मध्ये पहिला ‘जागतिक ओझोन दिवस’ साजरा करण्यात आला. ओझोन वायूच्या थराची होत असलेली थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. ओझोनला हानिकारक अशी उत्पादनांचा वापर टाळणं आपल्या हातात आहे.

ओझोन डेसाठी थीम

यंदाच्या वर्ल्ड ओझोन डे थराची थीम ही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - आपल्याला आपलं अन्न थंड ठेवायचंय अशी आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल खूप काही करते. यामध्ये हवामान बदलाचा वेग कमी करणं आणि थंड भागात उर्जेबाबत जागृती निर्माण करण्यात मदत करणे. यासह अन्न सुरक्षेसाठीही योदान देते. या वर्षीच्या थीमला १९७ देशांकडून मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी ओझोन फॉर लाइफ अशी थीम होती. पृथ्वीवर सजीवांसाठी ओझोन असणं गरजेचं आहे. पृथ्वीसाठी ओझोनच्या थराचे महत्त्व आणि पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठीच दरवर्षी ओझोन दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा: अगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’

ओझोनच्या थराची हानी कशी रोखायची?

ओझोनच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या पातळीवर काही उपाय करू शकतो. त्यात वाहनांद्वारे होणारं प्रदुषण रोखणं आपल्या हातात आहे. तसंच रबर, प्लास्टिक, टायर्स जाळण्याचं प्रमाण कमी करण्याची गरज आहे. तसंच आपण याशिवाय जास्त झाडे लावण्याची गरज आहे. पर्यावरणाला हानीकारक असलेल्या गोष्टींचा अतिवापर टाळायला हवा.

पृथ्वीवरील ओझोनचे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपण हाच खात्रीचा उपाय आहे. आंबा, पिंपळ, वड, निंब अशा शतकानुशतके टिकणाऱ्या वृक्षांप्रमाणेच घरोघरी तुळस लावणे हा वातावरणातील प्राणवायू व ओझोन वायू वाढविण्याचा प्रभावी उपाय आहे. शेवटी, ओझोनचे हे थर एखाद्या विशिष्ट देशाला प्रभावित करणारे घटक नसून, पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे अत्यावश्यक आवरण आहे.

go to top