
Xi Jinping, Vladimir Putin
esakal
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष
व्लादिमीर पुतीन यांच्यात नुकतीच ‘अमरत्वा’बाबत अनौपचारिक चर्चा झाली म्हणे. जगात कोणाही सत्ताधाऱ्याला आपण कायम सत्तेत राहावं, असं वाटत असतं. लोककथांमधले राजे पाहा किंवा देव पाहा. समुद्राचं मंथन करून त्यातून अमृत मिळवायची खटपट मंडळी करताना दिसतात. मग जगातील दोन हुकूमशहा तरी त्याला अपवाद कसे राहतील? दोघांनाही दीर्घायुष्य लाभो; पण त्यांची दादागिरी आणि हिंसा मात्र थांबो!!
जिंगमध्ये नुकतेच शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन लष्करी परेडची सलामी घेत असताना एकमेकांशी बोलले. आसपास लाइव्ह रेकॉर्डिंगची यंत्रणा जागरूक असल्याने हे बोलणं जाहीर झालं. झालेलं संभाषण असं... ‘तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालाय, की माणसाचे अवयव सतत बदलत राहतील. इतकं, की माणूस सतत अधिकाधिक तरुण होत जाईल, कदाचित अमर होईल...’ पुतीन रशियन भाषेत बोलले, दुभाषाने चिनी भाषेत अनुवाद केला...