Premium|Youth Financial Planning : देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा घेताना तरुणांनी आर्थिक स्वास्थ्य कसे जपावे?

Youth Financial Planning : YOLO जीवनशैली, शाश्वततेचा विचार, योग्य निर्णयक्षमता आणि लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाच्या काळात तरुणांनी आर्थिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व.
Youth Financial Planning

Youth Financial Planning

esakal

Updated on: 

पुरुषोत्तम बेडेकर - psbedekar२१@gmail.com

आजच्‍या पिढीपुढे महत्त्वाचा प्रश्‍न आहे तो म्हणजे, ‘योलो’ शैली स्‍वीकारायची, की शाश्‍वततेचा आग्रह धरून जीवनामध्‍ये समतोल साधायचा? आजच्या युगामध्‍ये ज्ञान, माहिती बोटांच्‍या क्लिकवर उपलब्ध आहे. याचा अर्थ त्या ज्ञानभंडाराचा उपयोग कसा करायचा, हे सर्वांना माहिती आहे, असे अजिबात नाही. याचे कारण म्‍हणजे, आजच्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर हे प्रत्‍येकाच्या विचारांमध्‍ये आहे. अमाप संधी उपलब्ध असल्या, तरी विचार आणि निर्णयांची गरिबी असेल, तर जीवनाच्या शर्यतीमध्‍ये मागे पडण्‍याची शक्यता जास्‍त आहे.

जबाबदार नागरिक बनण्‍याच्या उंबरठ्यावर असलेल्या आजच्या नवयुवकांच्या डोळ्यात उद्याची स्वप्ने, हाताशी अद्ययावत तंत्रज्ञान आणि आजूबाजूला असलेले चकचकाटी मोहमयी जग! यातून वाटचाल करताना, आजच्‍या नवयुवकांपुढे योग्य तो निर्णय घेऊन; आपल्या आयुष्याला उत्तम दिशा देता येऊ शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशाला  सध्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा (डेमोग्राफिक डिव्हिडंड) फायदा मिळत आहे आणि तो यापुढची किमान ३० वर्षे तरी मिळत राहील. १५ ते ५९ वर्षे वयोगटातील म्हणजेच काम करू शकणाऱ्या वयातील लोकसंख्या ६५ टक्क्यांच्या आसपास असल्यामुळे या काळात देश मोठी आर्थिक प्रगती साध्य करू शकतो. यापैकी नवयुवक आणि युवकांची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांनी आपल्याला उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करतानाच आपले आर्थिक स्वास्थ्य विचारपूर्वक कसे जपले पाहिजे, याचा विचार करूया.

Loading content, please wait...