Premium|Zohran Mamdani: झोहरान ममदानींपुढे खडतर आव्हान

Zohran Mamdani's Historic Victory : झोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी एकाच वेळी आफ्रिकन जन्म, शिया पंथ आणि भारतीय-अमेरिकी वारसा जपला आहे.
Zohran Mamdani's Historic Victory

Zohran Mamdani's Historic Victory

esakal

Updated on

जगाची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कचे महापौर म्हणून झोहरान ममदानी निवडून आले आहेत. या निमित्ताने दक्षिण आशियाई मुस्लिम व्यक्ती पहिल्यांदाच या पदावर बसणार आहे. ‘‘राजकीय काळोख पसरला असताना या क्षणी न्यूयॉर्कमध्ये मात्र एक नवी पहाट झाली आहे,’’ असे ममदानी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात म्हटले आहे. ममदानी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्यापुढील आव्हान नक्कीच मोठे असेल. ममदानी यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने...

न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी झोहरान ममदानी यांनी केलेली कामगिरी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. मुस्लिम दक्षिण आशियाई वंशाचे पहिले महापौर म्हणून निवडून येत, त्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ओळख आणि अस्मितांचे अद्वितीय असे मिश्रण साधले आहे. आफ्रिकेत जन्मलेले, दक्षिण आशियाचा वारसा लाभलेले आणि शिया पंथाचे अनुयायी असलेले ममदानी प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. निवडणुकीनंतर त्यांच्याकडे माध्यमांचे लक्ष गेले आहे. ‘‘इतिहासात क्वचितच असा क्षण येतो, जेव्हा आपण जुन्या युगातून नव्या युगात पाऊल टाकतो,’’ असे न्यूयॉर्कमध्ये जमलेल्या गर्दीसमोर बोलताना ममदानी म्हणाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७च्या स्वातंत्र्य भाषणातील शब्द त्यांनी उधृत केले आहेत. ‘‘खूप वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता, आणि आता तो करार पूर्ण करण्याची वेळ आली आहे,’’ असे नेहरू आपल्या भाषणात म्हणाले होते. हाच उतारा ममदानी यांनी आपल्या भाषणात म्हटला. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com