व्याजदर कमी आहेत तो पर्यंत घ्या Home Loan घेण्याचा निर्णय

Home Loan Interest Rate: गृहकर्जाच्या बाबतीत तुमची गरज महत्त्वाची असते. तुमच्या विशिष्ट आर्थिक गरजांना अनुसरून तयार करण्यात आलेल्या योग्य कर्ज प्रकारासाठी अर्ज करण्याच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आता वाढली आ
Home Loan Interest Rate
Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate: गृहकर्जाच्या बाबतीत तुमची गरज महत्त्वाची असते. तुमच्या विशिष्ट आर्थिक गरजांना अनुसरून तयार करण्यात आलेल्या योग्य कर्ज प्रकारासाठी अर्ज करण्याच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आता वाढली आहे.

कर्ज घटकांवर भारतीय रिझर्व्ह बँक Reserve Bank म्हणजेच आरबीआयचा देखील प्रभाव असतो. तुम्हाला सर्वोत्तम घरकर्ज Home Loan पाहिजे असेल तर योग्य कर्ज Loan प्रकार, त्याचे फायदे माहित असणे आणि सर्वोत्तम बँकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. 

पण घरकर्ज घेण्यासोबत त्याचे फायदे देखील आहेत. Know the benefits of home buying through home loan

 करांच्या संदर्भातील फायदे : घरकर्ज घेण्याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही करत असलेल्या मुद्दलाच्या रकमेवर आणि व्याजावर तुम्ही प्राप्तीकरातील वजावट मिळवू शकता.

तुम्ही कलम ८० सी अंतर्गत मुद्दल रकमेच्या परताव्यावर १.५ लाख रूपयांपर्यंत, कलम २४बी अंतर्गत व्याज रकमेच्या परताव्यावर २ लाख रूपये, कलम ८०सी अंतर्गत मुद्रांक शुल्काच्या खर्चावर १.५ लाख रूपयांपर्यंत दावा करू शकता.

तुम्ही कलम २४बी अंतर्गत व्याजाच्या परताव्यावर २ लाख रूपयांपर्यंत, कलम ८०ईई आणि ८०ईईएअंतर्गत विशिष्ट परिस्थितीत व्याजाच्या परताव्यावर २ लाख रूपयांपर्यंत आणि अधिक दावा करू शकता.

 व्याजदर कमी आहेत तो पर्यंत निर्णय घ्यावा..
गृहकर्जावरील व्याजदर हे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कर्जाच्या प्रकारापेक्षा खूप कमी आहेत. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरात केलेल्या वाढीमुळे सध्या घरकर्जाचे व्याजदर सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाताना दिसत आहेत.

येत्या काळात हे घरकर्जाचे व्याजदर वाढू शकतात. तेव्हा घरकर्ज घेण्याचा निर्णय शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून कमी दरातील वा आवाक्यात असलेल्या व्याजदरात घरकर्ज घेऊ शकाल.

 भूखंडाची सखोल चौकशी
तुम्ही बँकेच्या माध्यमातून घर खरेदी करता तेव्हा बँक मालमत्तेची सखोल चौकशी करेल आणि तुम्ही देत असलेली कोणतीही कागदपत्रे कायदेशीर आहेत की नाहीत हे ठरवेल.

बँकेकडून केली जाणारी ही सखोल चौकशी तुम्ही एखाद्या घोटाळ्याला बळी पडण्याची शक्यता कमी करते. बँकेने तो प्रोजेक्ट अप्रूव्ह केला असल्यास तुम्ही आणि तुमचे घर चांगल्या हातात आहात असे मानता येईल.

हे देखिल वाचा-

Home Loan Interest Rate
Home Loan : घर खरेदी करायचंय ? कुठे मिळवाल कमीत कमी व्याजदरात गृहकर्ज ?

घरकर्जासंबंधी इतर बाबी -

कर्ज परताव्याचा कालावधी : इतर प्रकारच्या कर्जांच्या विरूद्ध गृहकर्जांचा परतावा कालावधी दीर्घकालीन असतो. हा अनेकदा २०-२५ वर्षे असतो. हे एखादे घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या रकमेमुळे घडते. जास्त विस्तारित कालावधीवर कर्जाची रक्कम आणि लागू असलेला व्याजदर विस्तारित केल्यामुळे मासिक हप्ते कमी होतात आणि कर्जदाराचा भार कमी होतो.

 आधी कर्ज फेड केल्यास दंड नाही : तुम्ही चालू दराने घरकर्ज घेता तेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतील तेव्हा तुम्ही तुमच्या हातात असलेल्या निधीचा भरणा करून कर्जाची मुदती आधीच परतफेड करू शकता. त्यासाठी कोणताही प्रीपेमेंट दंड किंवा व्याजदर लागू होत नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या विहित कर्ज कालावधीपेक्षा खूप आधी गृहकर्जाचा परतावा करता येवू शकतो..

कोणते घरकर्ज फायदेशीर?

व्याजदरांच्या बाबतीत फिक्स्ड-रेट व अ‍ॅडजस्टेबल-रेट असे दोन प्रकारची गृहकर्जे असतात.

फिक्स्ड-रेट: निश्चित व्याजदरासह गृहकर्ज तुम्हाला तुमचे मासिक पेमेंट काटेकोरपणे जाणून घेण्याची सिक्युरिटी देते.

फ्लोटिंग-रेट: हा प्रकार व्याजदर कमी झाल्यास त्याचा लाभ देते. दुसरीकडे सध्याच्या बाजारपेठतील स्थितीमुळे व्याजदर वाढू शकतात. घरकर्ज काय आहे हे तुम्हाला उत्तमरित्या माहित असेल तर तुमच्या विद्यमान व भावी घराच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात अधिक योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com