अधिक होम लोन हवंय...मग CIBIL Score ठेवा चांगला

स्वतःचे घर असणे हे आयुष्यभराचे सत्यात उतरावे असे अनेकांच उद्दीष्ट असते. परंतु ती घरखरेदी आवाक्यातही असणे आवश्यक आहे.ग्राहकाच्या बजेटमध्ये स्वप्नातील घरं बसावी, यासाठी सर्वात मोलाची मदत घरकर्ज घेणे ही आहे
गृहकर्ज खरेदीदारांचा मदतनीस
गृहकर्ज खरेदीदारांचा मदतनीसEsakal

एक काळ होतो की, आपल्या आधीच्या पिढीमधील लोक आयुष्यभराची पुंजी एकत्रित करून सेवानिवृत्तीच्या वयामध्ये घरखरेदी Home Buying करायचे.पण आता काळ बदलला आहे. तरूण मंडळी भरभक्कम पगाराच्या जोरावर घरकर्ज Home Loan घेण्यासाठी प्राधान्य देताना दिसतात. Need More Home loan from Bank then Keep Cibil Score High

ही तरूण मंडळी गृहकर्जांचा वापर विविध प्रकारची मालमत्ता जसे की, नवीन घर,अपार्टमेंट,जुनी मालमत्ता,रिडेव्हलप होत असलेली मालमत्ता,प्लॉट, जमीन खरेदीसाठी गृहकर्जाची मदत घेतात.गृहकर्ज तुमचे स्वप्न Dream सत्यात उतरवण्यासाठी मदत करते.

स्वतःचे घर असणे हे आयुष्यभराचे सत्यात उतरावे असे अनेकांच उद्दीष्ट असते. परंतु ती घरखरेदी आवाक्यातही असणे आवश्यक आहे.ग्राहकाच्या बजेटमध्ये Budget स्वप्नातील घरं बसावी, यासाठी सर्वात मोलाची मदत घरकर्ज घेणे ही आहे.राष्ट्रीय व खासगी बँका त्यांच्या ग्राहकांच्या मागण्या अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची गृहकर्जे देतात.दरम्यान सध्याच्या काळात हा विषय अर्जदाराच्या सिबिल रेकॉर्डशी अधिक जोडलेला दिसून येतो. तुमचे सिबिल स्कोर जेवढा अधिक चांगला तेवढे कर्ज अधिक... हा ठोकताळा लक्षात ठेवावा.

हे देखिल वाचा-

गृहकर्ज खरेदीदारांचा मदतनीस
Home Loan : घर खरेदी करायचंय ? कुठे मिळवाल कमीत कमी व्याजदरात गृहकर्ज ?

घरकर्जाचे प्रकार :

जमीन खरेदी कर्ज : अनेक संस्था जमीन खरेदी करण्यासाठी कर्जे देतात. जमीन खरेदी हा लवचिक पर्याय आहे. ग्राहक पैशांची बचत करून त्यांच्या बजेटमध्ये असेल तेव्हा घर खरेदी करू शकतात किंवा ते एखादी मालमत्ता एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून राखून ठेवू शकतात. काही खासगी जमीन खरेदीच्या एकूण खर्चाच्या ८०- ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात.

घर खरेदी कर्ज : गृहकर्जांच्या संदर्भात सर्वाधिक सर्वसामान्य प्रकारचे कर्ज म्हणजे नवीन किंवा आधी दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीचे घर घेण्यासाठी कर्ज होय. हे कर्ज व्यापक स्वरूपात सहजसाध्य आहे आणि ते विविध स्वरूपात विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून दिले जाते. व्याजदर फ्लोटिंग किंवा फिक्स्ड असते. त्याचबरोबर विविध बँका ग्राहकाची घरकर्ज परताव्याची क्षमता तपासून एकूण रकमेच्या जवळपास ८०-८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यास तयार असतात.

घर बांधणी कर्ज : हे कर्ज ज्या व्यक्तींना विशेषतः आधीच निश्चित असलेल्या रचनेतील घर खरेदी न करता आपल्या आवश्यकतांप्रमाणे घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी तयार केलेले आहे. या स्वरूपातील कर्जाची मान्यता प्रक्रिया खूप खास आहे, कारण त्यातून भूखंडाचा खर्च आणि कर्जाची रक्कम विचारात घेतली जाते.

घरबांधणी कर्जासाठी अर्ज करत असताना लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा म्हणजे मुद्दा भूखंडाची किंमत कर्जाच्या रकमेत समाविष्ट करण्यासाठी मालमत्ता ही एक वर्षाच्या आत खरेदी केलेली असली पाहिजे. कर्जाची रक्कम ही बांधकाम खर्चाच्या सुमारे अंदाजाद्वारे निश्चित केली जाते. रकमा एकतर एकल एकत्रित किंवा अनेक लहान लहान रकमांमध्ये दिल्या जाऊ शकतात. काही राष्ट्रीयकृत बँका संस्था आहेत जी लोकप्रिय घरबांधणी कर्जे देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com