‘स्प्रेड’च्या मदतीने Home Loan EMI कमी करणं शक्य, जाणून घ्या गणित

How to reduce home loan burden: गृहकर्ज Home Loan हे रिटेल लोन या कॅटेगरीत येतं. याचे दोन महत्वपूर्ण भाग आहेत. ते म्हणजे बेंचमार्क दर आणि स्प्रेड दर.
Home Loan EMI
Home Loan EMIEsakal

Home Loan EMI: स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरं घेण्यासाठी आपण मोठी मेहनत करतो. मात्र अलिकडे घरांच्या वाढत्या किमती पाहता घर घेण्यासाठी गृह कर्जाशिवाय पर्याय नाही. घरांच्या किमतींसोबतच गृह कर्जांच्या व्याज दरांमध्येही मोठी वाढ झाली असली.

तर कर्ज घेऊन घरं घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं जात आहे. हे स्वप्न पूर्ण झालं तरी पुढील १५-२० वर्षांसाठी ईएमआय म्हणजेच मासिक हप्त्याची चिंता मात्र सुरू होते. Reduce your EMI by Availing Sprade Rates

शिवाय हे हप्ते EMI भरत असताना हे मोठी व्याजाची रक्कम आपण बँकेला देत असतो. असं असलं तरी एका पर्यायाच्या मदतीने तुम्हाला होम लोनचा EMI कमी करणं शक्य आहे. तो पर्याय म्हणजे ‘स्प्रेड’. खरंतर गृहकर्ज Home Loan हे रिटेल लोन या कॅटेगरीत येतं.

याचे दोन महत्वपूर्ण भाग आहेत. ते म्हणजे बेंचमार्क दर आणि स्प्रेड दर. प्रत्येक कर्जदाराचा स्प्रेड दर हा वेगळा असला तरी कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी तो स्थिर राहतो. कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्नाचा स्त्रोत आणि कर्जाचा आकार यावर स्प्रेडची गणना केली जाते.

बचतीचं गणित

समजा तुम्ही १.९०% च्या किमान स्प्रेड दराने गृह कर्ज घेतलं आहे. आता रेपो दर घसरला आणि तुमच्या गृहकर्जाचा दर ४ टक्क्यांवर आला. अशावेळी तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर हा ५.९० टक्के इतका असेल.

समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने २.६५ टक्के स्प्रेड दराने होम लोन घेतलं आहे. तर कर्जाच्या पूर्ण अवधिसाठी त्याचा अपेक्षित व्याज दर हा (2.65+4=6.65) ६.६५ टक्के इतका होईल. 

कर्जाच्या पूर्ण कालावधीत स्प्रेड दर राहतो स्थिर

बेंचमार्क हा कर्ज उपलब्ध होण्यासाठीचा किमीन दर आहे. हा दर बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांची धोरणं, महागाईचा दर आणि रेपो दरातील बदलांच्या आधारे ठरवला जातो. त्यामुळे रेपो दरात वाढ होताचा गृह कर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होते. तर स्प्रेडची गणना ही कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्नाचा स्त्रोत आणि कर्जाच्या आकारावर अवलंबून असतो.

प्रत्येक कर्जदारासाठी तो वेगवेगळा असतो. यावर रेपो दराच्या वाढीचा परिणाम होत नाही. हा कर्जाच्या संपूर्ण कालावधीत स्थिर राहतो आणि होम लोनच्या दरासोबत जोडला जातो. मार्च २०२०मध्ये स्प्रेड दर ३.५० टक्के होता जो मार्च २०२३ मध्ये १.९० टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच यात घट झाली आहे. 

या चार घटकांच्या मदतीने ओझं कमी करणं शक्य

चालू बँकेकडून रिफायनेंस- तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे त्या बँकेकडून कमी दरात रिफायनेंस करा. यावेळी प्रोसेसिंग फी तपासून घेणं गरजेंचं आहे. 

बॅलेंस ट्रान्सफर करा- तुमची बँक तुमच्याकडून अधिक व्याज आकारतेय असं तुम्हाला वाटत असेल आणि याचवेळी इतर बँकेत व्याजदर कमी आहे असं वाटल्यास तुम्ही होम लोनचं बॅलेन्स दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

म्हणजेच तुमचं कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करू शकता. (Transfer Home Loan). मात्र हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँकेला भरावी लागणारी पेनल्टी फी आणि दुसऱ्या बँकेची प्रोसेसिंग फी याचा हिशोब करावा लागेल.

हे देखिल वाचा-

Home Loan EMI
Best Home Loan banks: घर खरेदी करताय? गृहकर्ज देण्यात अग्रेसर आहेत ‘या’ पाच बँका!

ईएमआई वाढवा - कर्जाचा कालावधी हा मोठा म्हणजेच १५-२० वर्षांचा असतो. कर्ज घेते वेळी सुरु असलेल्या उत्पन्नानुसार एकूण खर्च लक्षात येऊन मासिक हप्ता म्हणजेच EMI लागू केला जातो. मात्र बर्याचदा काही वर्षांनंतर उत्पन्नात वाढ होते.

जसं की पगारवाढ, बोनस, व्यवसाय विस्तार अशावेळी आपण बँकेशी चर्चा करून EMIची रक्कम वाढवू शकता. यामुळे तुमच्या कर्जाची मुद्दल कमी होईल परिणामी कर्जावर आकारण्यात येणार व्याजही कमी होईल. आणि कर्जातून तुमची काही वर्ष लवकर सुटका होईल. तसचं तुम्ही वर्षाला १ हप्ता जास्त भरूनही कालावधी कमी करणं शक्य आहे.

होम लोनचं प्रिपेमेंट- गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचा काही काळ हा तुम्ही प्रिन्सिपल पेक्षा जास्त व्याज भरत असता.

म्हणजेच जर तुमचा हप्ता २५ हजार रुपये आहे तर जवळपास १५ हजार तुम्ही व्याज भरत असता. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतर काही काळात तुमच्याजवळ एखादी मोठी रक्कम आल्यास तुम्ही प्रिपेमेंट करून कर्जाचा कालावधी कमी करू शकता.

हे करत असताना मात्र प्रिपेमेंट चार्जेसची माहिती घ्यावी. त्यामुळेत जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि उत्पन्नदेखील चांगल असेल तर कमीत कमी स्प्रेड रेटचा लाभ घेण्याचा प्रयत्न कारावा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com