Property Purchase Muhurat..तर या शुभमुहूर्तावरची घर खरेदी देईल अधिक आनंद

Property Purchase Muhurat: आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटते. प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो. ज्यांचं स्वत:चं घर नाही अशा व्यक्ती घर खरेदीसाठी मुहूर्त शोधत असतात. अक्षय्यतृतिया हा त्यासाठी सुयोग्य क्षण
Property Purchase Muhurat
Property Purchase Muhurat Esakal

Property Purchase Muhurat : अक्षय्य तृतिया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी अनेक चांगल्या कामांना प्रारंभ केला जातो. त्याचबरोबर या दिवशी केलेली खरेदी अक्षय्य मानली जात असल्याने या दिवशी सोनं आणि इतर वस्तूंचीही खरेदी केली जाते.

आता या सणा दिवशी मागील काही वर्षांपासून घर खरेदी देखील केली जाते आहे. ही घरखरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्याबाबत थोडक्यात...

आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटते. प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो. ज्यांचं स्वत:चं घर नाही अशा व्यक्ती घर खरेदीसाठी Home Buying मुहूर्त शोधत असतात. अक्षय्यतृतिया Akhsyya Tritiya हा त्यासाठी सुयोग्य क्षण...

अक्षय्य तृतियेच्या दिवशी ज्या प्रमाणे सोने खरेदी केले त्याचप्रमाणे घर खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर घर खरेदी केली की त्यामध्ये अक्षय्य आनंद मिळेल अशी अनेक जणांची भावना असते. त्यामुळे बहुसंख्य लोक घर खरेदीसाठी अक्षय्य तृतियेलाच अधिक पसंती देताना दिसतात. What Precautions to be taken before buying home on Akshayya Tritiya

त्यासाठी ग्राहक आणि व्यावसायिक आधी पासूनच तयारीला लागतात. अनेक बांधकाम व्यावसायिक नव्या गृहप्रकल्पांचे मुहूर्त अगोदर करुन सॅम्पल फ्लॅट तयार करुन ठेवतात.

ते ग्राहकांसाठी काही आकर्षक योजनाही आखतात. अनेकदा त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखले जातात. अनेकदा ते ग्राहकांसाठी सवलतीच्या योजना देखील सादर करतात. 

- आपल्याला सदनिका विकत घ्यायची असेल आणि खरेदीची घाई नसेल तर बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात नाव नोंदवावे. कारण त्यावेळी दर सगळ्यात कमी असतात.

शिवाय, फ्लॅटची सगळी रक्कम आपल्याला एकदम भरावी लागत नाही. अनेकदा आपल्या बिल्डींगचा प्रत्येक स्लॅब पडल्यावर थोडे पैसे भरावे लागतात. त्यामुळे आपल्या एकूण बजेटपेक्षा थोडं मोठं बजेटही ठेवता येऊ शकते.

हे देखिल वाचा -

Property Purchase Muhurat
Akshayya Tritiya Special रिअल इस्टेट - अक्षय्य गुंतवणुकीचे क्षेत्र...

 - घर खरेदी करताना विकसक कोण आहे, हे बघूनच घर निवडावं. याचं कारण म्हणजे, एकूणच व्यवहार व बांधकामाच्या दर्जाबद्दल खात्री देता येते. 

- घर निवडताना आपल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या गरजा ओळखूनच निवडावे. घरातील सदस्य संख्या व त्यांच्या गरजांचा सर्वांगाने विचार करावा. भविष्यामध्ये जर सदस्यांची संख्या वाढणार असेल, तर त्याची सोय आधीच करणे सोयीचे व आवश्यक ठरते.

- घरासाठीच्या बजेटचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आर्थिक नियोजन हे कोलमडून पडता कामा नये...

- नव्या घरापासून मुलांची शाळा, महाविद्यालयं, लहानसहान वस्तुंची उपलब्धता, बाजारपेठ, हॉस्पीटल, बाग आहेत का हे आधी जरूर पाहावे.. 

- बर्‍याच जणांना सोसायटीत आणि घरात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, टू वे इंटर कॉम, टेनिस कोर्ट अशा अत्याधुनिक सुविधा हव्या असतात. या सर्व आधुनिक सुविधा संबंधित प्रकल्पात आहेत का आणि ते आपल्या बजेटमध्ये बसणारे आहे का, हे तपासून बघावे. 

- भविष्यात सोसायटी स्थापन झाल्यानंतर मेंटेनन्स भरणे आपल्याला शक्य होईल का हे देखील तपासावे. 

- केवळ गुंतवणूक म्हणूनच काही जण घर घेण्याचा प्राधान्य क्रम असतो. मुलांसाठी, नातेवाईकांसाठी, घर भाड्याने देऊन उत्पन्न मिळवणे अशी कारणे देखील अनेकवेळा असलेली दिसतात. त्यामुळे घर घेताना ते नेमके कोणत्या कारणासाठी घेणार आहात त्यानुसार खरेदी करावे. म्हणजेच, उत्पन्नाचं अतिरिक्त साधन म्हणून भाड्याने घर द्यायचे असेल तर भाडे चांगले मिळेल अशा उपनगरात घ्यावे. 

- बांधकाम सुरू असलेले घर केवळ गुंतवणूक म्हणून घेतले असेल आणि काही दिवसांनी विकणार असाल तर शक्यतो बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच विकण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यावेळी त्या गृह प्रकल्पाचे दर सर्वाधिक असतात. 

हे देखिल वाचा-

Property Purchase Muhurat
Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला अक्षय संपत्तीसाठी हे करा सोपे उपाय

- अनोळखी शहरात घर घेणार असाल तर एखाद्या मित्र, नातेवाईकांची मदत अवश्य घ्यावी. तसेच तज्ज्ञ वकिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. व्यवहार करताना राज्य आणि केंद्र शासनाचे मालमत्तेसंबंधी असणारे कायदे कोणते, हे व्यवस्थित जाणून घ्यावे.

- मालमत्ता मालकाच्या स्वतःच्या मालकीची आहे की भाडे तत्त्वावर आहे, जागेसंबंधी काही विवाद आहेत का, जागेच्या आजूबाजूचा भाग कसा आहे, मालमत्तेकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता आहे का, ते घर ज्या कॉलनीत अथवा जागेत आहे ती अधिकृत आहे का असे सर्व तपशील तपासून बघावे. 

- ते तपासताना प्रथम सात-बाराच्या किंवा सिटी सर्व्हेचा चालू आणि मागील काही वर्षांचे उतारे, त्यावरील फेरफार नोंदींचे उतारे, तसेच खाते उतारा, मागील सर्व खरेदीखत, चतु:सीमा, मूळ मालकापासून, सध्याच्या मालकापर्यंत मालमत्तेच्या हस्तांतराचा प्रवास आणि त्याचा तपशील, जमीन मालकाचे फोटो-ओळखपत्र, चालू कर भरल्याच्या सर्व पावत्या अशा सर्व गोष्टींचा विचार घर खरेदी करण्यापूर्वी करावा. 

वरील गोष्टींची काळजी घेतल्यास सणाच्या काळातील ही घरखरेदी निश्चिंत सणांच्या आनंदासोबतच वास्तू खरेदीचा आनंदात अधिकची भरच घालेल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com