

Dharavi Redevelopment
ESakal
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चांगलाच वेग मिळाला असून मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी देखील पुनर्विकासाच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. अदानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,धारावीत आतापर्यंत 2250 हून अधिक रहिवाशांसोबत भाडेकरार पूर्ण झाले आहेत. तसेच 1023 कुटुंबांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्वच्छने घरे रिकामी केली आहेत.