तुमच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

‘सकाळ’ वास्तू ‘एक्स्पो’ला आजपासून पुण्यात सुरुवात
Sakal Vastu Expo 2023
Sakal Vastu Expo 2023Sakal

पुणे : तुमच्या हक्काचे घर आता लवकरच पूर्ण होऊ शकते. सकाळ वास्तू ‘एक्स्पो’ २०२३ घेऊन आलंय तुमच्या बजेटमध्ये घरांचे असंख्य पर्याय. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आजपासून ‘सकाळ’ आयोजित वास्तू ‘एक्स्पो’ला सुरुवात होत आहे. ‘एक्स्पो’चे उद्‍घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे, प्रसिद्ध कलाकार सौरभ गोखले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे होईल.

प्रदर्शन शनिवार (ता. २२) आणि रविवार (ता. २३) असे दोन दिवस असेल. पुणे शहरासह सातारा, कोल्हापूर येथील घरे, प्लॉट, व्यावसायिक कार्यालय (कमर्शिअल स्पेस) एकाच ठिकाणी पाहायला तसेच खरेदी करायला मिळेल. हे गृहप्रकल्प पाहून तुलनात्मक निर्णय घेण्याची मोठी संधी नागरिकांना आहे. शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक व दर्जेदार गृहप्रकल्पांचा यात सामावेश आहे.

शासनाने २०२३-२४ वर्षासाठी रेडीरेकनर दर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. या निर्णयामुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा ग्राहकांचा ओढा वाढला आहे. मागील वर्षी उच्चांकी मुद्रांक शुल्क महसूलात झालेली वाढ हे या क्षेत्रासाठी उत्साही वातावरणात आहे. पुणे शहरासह परिसरातील घरांची विक्री, नवनवीन अत्याधुनिक सुविधांयुक्त होत असलेले गृहप्रकल्प यामुळे मागणी वाढत आहे. मागील गुढीपाडव्याला मिळालेला प्रतिसाद आणि उद्या असलेला अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त या क्षेत्रातील तेजीचा उच्चांक होण्याची खात्री वाटते.

- अंकुश आसबे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्री वेंकटेश बिल्डकॉन

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ‘सकाळ’ने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वास्तू प्रदर्शन भरवले आहे. शहरातील अनेक गृहप्रकल्प पाहण्याची संधी नागरिकांना आहे. रेडीरेकनर व मुद्रांक शुल्कात वाढ न झाल्याने घर घेण्यासाठी नागरिकांना अनुकूल वेळ आहे.

- गणेश जाधव, सह संस्थापक, गंगोत्री होम्स्

गुंठ्यापासून ते एकरापर्यंत जमिनी, बंगलो प्लॉट्स, शेतजमीन, फार्महाऊस प्लॉट्स, फार्म प्रोजेक्ट्स योग्य किमतीत आणि चांगल्या ठिकाणी शहरापासूनजवळ उपलब्ध असतील.गुंतवणूक करण्यासाठीही या गोष्टीकडे पाहिले जाते. हे सर्व पाहण्याची व खरेदीची संधी सकाळने वास्तू प्रदर्शनातून नागरिकांना दिली आहे.

- प्रिया पवार, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, सुप्रीम रियालिटी

घरासाठी अनुकूल वेळ

या वर्षी सरकारने रेडीरेकनरचे दर वाढवले नाहीत

घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची जुन्या दरानेच आकारणी

रेडिरेकनर दर व मुद्रांक शुल्क वाढ नसल्याने घरांच्या किंमती स्थिर

बँकांकडून कर्ज सुविधा उपलब्ध

‘एक्स्पो’मध्ये काय?

पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा भागातील नामांकित व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

एकाच छताखाली अनेक दर्जेदार बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार.

वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचके, प्लॉट, व्यावसायिक (कमर्शिअल स्पेस) आॕफिस, घरांची माहिती मिळणार

काय? : ‘सकाळ’ वास्तू एक्स्पो २०२३

कुठे? : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर पुणे

कधी? : शनिवार व रविवार अर्थात २२ व २३ एप्रिल २०२३

केव्हा? : सकाळी १० ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

प्रवेश व पार्किंग : विनामूल्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com