
Pride World City : पुणे, एक समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण महानगर आहे. परंपरा आणि आधुनिकतेच्या उत्तम मिश्रणामुळे हे चांगली जीवनशैली देणारं आणि राहण्याजोगं शहर बनलं आहे. रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांसाठी प्रसिद्ध असलेले पुणे हे गुंतवणूकदारांसाठी लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
प्राइड वर्ल्ड सिटी (PWC)हा पुण्याच्या पूर्वेस उभा असलेला शहरातील सर्वात मोठा आणि एकमेव टाउनशिप प्रकल्प आहे जो रहिवाशांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक खास संधी देतो.
गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून पुण्याच्या प्रभावशाली विस्ताराचे श्रेय तेथील शैक्षणिक वातावरणाला जाते. उच्च शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र तर आहेच पण इथली श्रमिक बाजारपेठसुद्धा वाढते आहे.
शहरातील प्रमुख संस्था आणि वैविध्यपूर्ण उद्योगांचा परिणाम म्हणून, व्यावसायिक आणि विद्यार्थी दोघांनाही इथे उज्वल भवितव्य आहे.निवासी आणि व्यावसायिक जागेच्या वाढत्या मागणीमुळे, पुण्यात रिअल इस्टेट व्यवसायात तेजी आली आहे.
इतर अनेक विकासप्रकल्पांपेक्षा प्राईड वर्ल्ड सिटी हे मॉडेल टाउनशिप प्रकल्प म्हणून वेगळे आहे. हा प्रकल्प आपल्या रहिवाशांना भरपूर फायदे देतो.प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये समकालीन वास्तुकला, आधुनिकता आणि कुशलतेचा संगम आहे.
यामुळे एक आनंददायी आणि संपन्न राहणीमान मिळते. 2BHK, 3BHK, आणि 4BHK सह, भाडेकरूंच्या मागण्या आणि प्राधान्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी अपार्टमेंट विविध लेआउट्समध्ये ऑफर केले जातात. प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये जबाबदारी आणि मोकळेपणा या गुणांना महत्त्व दिले जाते. हा RERA-प्रमाणित प्रकल्प आहे.
अजिंक्य डी वाय पाटील कॉलेजला लागून असलेल्या नवीन निवासी नंदनवनात शिक्षण आणि सोयीसुविधा यांचे परिपूर्ण मिश्रण आढळते. नैसर्गिक टेकडीसारख्या नयनरम्य जागी वसलेले हे स्थान इथल्या घरांना आणि रहिवाशांना शांत वातावरण देते.
प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये प्राइड वर्ल्ड सिटी - बोस्टन पुणे, प्राइड वर्ल्ड सिटी - सोहो पुणे, प्राइड वर्ल्ड सिटी - वेलिंग्टन पुणे, प्राइड वर्ल्ड सिटी - मॅनहॅटन पुणे आणि प्राइड वर्ल्ड सिटी - अटलांटिक पुणे आदी अनेक पर्याय तुम्हाला निवडता येतील. या विशाल आणि सुनियोजित समुदायामध्ये आपले स्वप्नातील घर तुम्ही निवडू शकता. प्रत्येक साइट खास आणि देखणी आहे.
नागरिकांच्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी PWC कडे व्यावसायिक संस्था आहेत. इथे घरासोबतच तुमच्या प्रतिभेला आणि क्षमतेला पूरक आणि तारक वातावरण शोधण्याची संधी आहे. PWC संगीत आणि कला केंद्रांपासून क्रीडा अकादमींपर्यंत सर्वसमावेशक धोरण इथे आहे.
या टाउनशिपमधील फ्युचर लाइफस्टाइल क्लबमुळे लोकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील, त्यांची जीवनशैली अधिक चांगली होईल आणि एकमेकांविषयीचा सौहार्द आणि संघभावनेला प्रोत्साहन दिले जाईल. हा क्लब रहिवाशांमधील संवादमाध्यम होईल.
प्राइड वर्ल्ड सिटीमध्ये राहण्याचा मुख्य फायदा म्हणजे किंमत वाढण्याची शक्यता. पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसून आली आहे आणि PWC ही गुंतवणूकदार आणि घरमालकांसाठी या वाढीच्या ट्रेंडचा फायदा घेण्याची उत्तम संधी आहे.या टाऊनशिपमधील पायाभूत सुविधा आणि दळणवळणातील सुलभता यामुळे गुंतवणुकीवर सकारात्मक परताव्याची हमी इथे नक्की मिळेल.
PWC एक शांत आणि आकर्षक वातावरण देते जे शहराच्या गजबजाटापासून दूर नेईल. चांगले हवामान आणि सभोवतालच्या वातावरणामुळे हे टाउनशिप म्हणजे जणू एक स्वर्ग आहे.
1995 पासून कार्यरत असलेल्या प्राईड ग्रुपने पुणे, मुंबई आणि बेंगळुरू येथील स्कायलाइन बदलात आणि शहर नियोजनात मोठे योगदान दिले आहे.
नाविन्यपूर्ण योजना आणि उत्तम, उत्कृष्ट काम करण्याचा ध्यास यामुळे प्राइड ग्रूप आज निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील एक उत्तम आणि प्रतिष्ठित विकासक कंपनी होण्याचा मान मिळवून दिला आहे. आमच्या वेगळ्या आणि समकालीन डिझाईन्स, त्यातील बारकाव्यांकडे कष्टपूर्वक लक्ष देणे, उच्च अभियांत्रिकी मानके, नैतिक पद्धती आणि व्यावसायिक दृष्टीकोन यामुळे प्राइड ग्रूप म्हणजेच विश्वासाचे दुसरे नाव आहे.
प्राईड वर्ल्ड सिटी हा प्राईड बिल्डर्स एलएलपीचा एक खास उप-ब्रँड म्हणून उदयास आला आहे. प्राईड वर्ल्ड सिटी, उत्कृष्ट वास्तुकलेचे नवीन युग हे पुण्याच्या पूर्वेकडील भागात वसले आहे. प्राईड ग्रुपच्या ऐतिहासिक परंपरेला अत्याधुनिक डिझाइनसह कुशलतेने जोडून ते रिअल इस्टेट क्षेत्रात नवनवीन मानके प्रस्थापित केली जातात.
पूर्ण विकसित टाउनशिप मॉडेल आणि आता उपलब्ध असलेल्या सॅम्पल अपार्टमेंटसह आधुनिक राहणीमानाचा अनुभव घ्या. या प्रकल्पातील उत्तम प्रकारे आखलेले पायाभूत सुविधांचे आणि दळणवळणाचे जाळे यामुळे तुम्हाला आरामदायी आणि स्टायलिश राहणीमानाची झलक मिळेल.
प्राइड वर्ल्ड सिटी येथे येणाऱ्या अभ्यागतांचे स्वागत करते. PWC ला भेट दिल्याने टाउनशिपची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आणि सुविधा तुम्हाला लक्षात येतील. तुम्ही संभाव्य गृह ग्राहक असाल अथवा बुद्धिमान गुंतवमूकदार. विकासाच्या संधींचे हे नवे जग अनुभवण्यासाठी आणि पाहण्यासाठी प्राइड वर्ल्ड सिटीला भेट द्या.
अधिक तपशिलांसाठी www.prideworldcity.co.in या प्राइड वर्ल्ड सिटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.