आठ-दहा दशकांहून अधिक जुन्या असलेल्या दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा कालबद्ध पुनर्विकासाच्या माध्यमातून कायापालट केला जाणार आहे. १३ हजारांहून अधिक इमारती अद्याप पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असल्याने तिथे वास्तव्यास असलेले सुमारे साडेसहा लाख भाडेकरू, रहिवासी पुनर्विकसित घराचे स्वप्न पाहत आहेत.