घरांतील कोपऱ्यांना द्या New Look ; अडगळीने नाही तर सौदर्यांने बदलतील घराचा साज

थोडी क्रिएटिव्हिटी असेल तर छोट्या जागेतही बरंच काही करता येऊ शकतं. घराच्या सजावटीत तिथल्या कोपऱ्यांना महत्त्व दिलं तर घराचा Home लुक कसा बदलून जातो ते पाहा
घरातील कोपऱ्यांना नवा लूक
घरातील कोपऱ्यांना नवा लूकEsakal

थोडी क्रिएटिव्हिटी असेल तर छोट्या जागेतही बरंच काही करता येऊ शकतं. घराच्या सजावटीत तिथल्या कोपऱ्यांना महत्त्व दिलं तर घराचा Home लुक कसा बदलून जातो ते पाहा. बऱ्याचदा घराच्या सजावटीत Home Decor कोपऱ्यांना महत्त्व दिलं जात नाही. Home Decoration Marathi Tips Use Corners of Enhance Beauty of Home

तिथे नेमकं काय करायचं हेच अनेकदा कळत नाही. ती जागा मोकळी राहते आणि त्याचा उपयोगही होत नाही. सौंदर्यात Beauty भर टाकण्याच्या दृष्टीनेही कोपऱ्यांना Corners महत्त्व दिलं पाहिजे. या जागेचा उपयोग विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो.

या ठिकाणी तुम्ही पर्सनल स्पेस बनवू शकता, एखासी रिलॅक्स चेअर टाकून किंवा बुक शेल्फ ठेवून त्याची लायब्ररी बनवू शकता किंवा त्याचा स्टोरेजसाठी उपयोग करू शकता. ग्रीन कॉर्नर तयार करून घराच्या सौंदर्यात भर टाकू शकता.

त्यासाठी थोड्या कल्पनाशक्तीची गरज आहे. त्यासाठी थोडं प्लॅनिंगही आवश्यक आहे. ज्या प्रकारे तुम्ही हा कॉर्नर सजवू इच्छिता त्यासाठी काही वस्तूंची सजावटीच्या सामानाची गरज लागेल. त्याचं बजेटही पाहायला हवं. थोडक्यात वेळ काढून या कोपऱ्यांकडे पाहायला लागणार आहे.

सर्वांत आधी कोणत्या कारणासाठी विशिष्ट कोपरा वापरायचा आहे याचा विचार करा. उदा. एंटरटेनमेंट कॉर्नर म्हणून तो सजवायचा असेल तर तिथे टीव्ही, टेप, होम थिएटर यापैकी काय येणार आहे त्याचं वायरिंग कसं असेल, या वस्तू ठेवण्यासाठी काही फर्निचर आणावं लागेल का या गोष्टींचा विचार करावा लागेल.

ही जागा स्टडी किंवा लायब्ररी म्हणून वापरायची असेल तर शेल्फ आणि सीटिंग अरेंजमेंट कशी करणार याचा विचार करावा लागेल. तिथे इजी चेअर किंवा एल टाईप सोफा ठेवण्याची जागा आहे का याची पाहणी करावी लागेल.

एकदा काय करायचं हे ठरलं की त्याप्रमाणे खरेदी करता येईल. यात कोणत्या प्रकारचं मटेरिअल वापरायचं तेही ठरवावं लागेल. वुडन, मेटल किंवा मॉड्युलर अशा पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागेल. कोपऱ्याच्या जागेचा जास्तीत जास्त वापर करायचा असेल तर भिंतीवर शेल्फ तयार करून खाली स्टडी टेबल ठेवता येईल.

हे देखिल वाचा-

आता कोपऱ्यात कशा प्रकारे सजावट करता येईल याचे काही पर्याय पाहू या. जिन्याच्या पायऱ्यांखालची जागा उपयोगात आणायची असेल तर तिथे पुस्तकं Books ठेवायला चांगला पर्याय निर्माण करता येतो.

तिथे म्युझिक कॉर्नर Music Corner तयार करता येईल. बुक शेल्फजवळ एक इजी चेअर ठेवली तर प्रायव्हेट रीडिंग एरिया तयार होऊ शकतो. नुसत्या शोभेसाठी जागा वापरायची असेल तर तिथे मोठे ब्रास पॉट ठेवा. वरून हॅगिंग लाईट सोडल्यास ही जागा हाईलाईट करता येते.

साईड टेबल वापरल्याने जागा कमी लागते आणि सजावटीत भर पडते. आता बाजारात दोन किंवा तीन मल्टीपर्पज स्टोरेज असलेली साईड टेबल आली आहेत. वरच्या बाजूला आर्ट पिसेस, फोटो फ्रेम, फुलदाणी ठेवायलाही जागा राहते. कोपरे सजवताना त्याकडे व्यवस्थित लक्ष जाईल याची काळजी घ्यायला हवी.

त्यासाठी लाइटचा उपयोग करून घेता येईल. हँगिंग लाईट यासाठी फार उपयोगी पडतात. फोअर लाईटचाही वापर करता येईल किंवा भिंतीत बसवलेले लाईटही वेगळा इफेक्ट दाखवतात. जो कोपरा सजवायचा आहे त्याला वॉलपेपर लावून वेगळा लूक देता येईल किंवा वेगळ्या रंगात रंगवून त्याची शान वाढवता येईल.

घरातील कोपऱ्यांना नवा लूक
Dream Home प्रत्यक्षात साकारताना ही घ्या काळजी

कोपरे सजवताना मुव्हिंग फर्निचरचा पर्यायही चांगला असतो. अनेक कप्पे असलेलं टीव्ही युनिट किंवा एंटरटेनमेंट युनिट वापरल्याने ते पाहिजे त्या ठिकाणी हलवता येऊ शकतं. एल आकाराचे सोफे, बीन बॅग्ज हे त्यातले काही परिचित प्रकार आहेत. काचेचे दार असलेल्या कॉर्नर युनिटमुळे जागा कमी लागून शोभेच्या वस्तू ठेवायलाही जागा मिळते.

कोपऱ्यात तुम्हाला नैसर्गिक टच द्यायचा असेल तर तिथे तुम्ही ग्रीन कॉर्नर तयार करू शकता. यासाठी एखादं इन डोअर प्लॅन्ट आणा. त्याच्या कुंडीभोवती आर्टीफिशीयल दगड, गोटे किंवा शंख शिंपले टाकून त्यातील माती दिसणार नाही याची काळजी घ्या. त्याच्याजवळ एका काचेच्या भांड्यात फुलांच्या पाकळ्या टाकून ठेवा. कँडल स्टैंड ठेवून त्याची शोभा वाढवा.

त्यावर प्रकाश व्यवस्थित येईल याची काळजी घ्या म्हणजे तो कोपरा उठून दिसेल. बेडरूममधला एखादा कोपरा जर स्टडी कॉर्नर म्हणून सजवायचा असेल, तर तिथे खिडकीच्या उंचीचं साधं त्रिकोणी आकाराचं कॉर्नर टेवल ठेवा. त्यावर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप ठेवता येईल. बुक शेल्फ ठेवता येईल आणि त्याचा उपयोग काम करण्यासाठी करता येईल.

हे देखिल वाचा-

घरातील कोपऱ्यांना नवा लूक
Home Decor : घरातल्या जून्या जीन्स पासून बनवा या ५ आकर्षक वस्तू

हॉलमध्ये विश्रांतीचा कोपरा तयार करायचा असल्यास तिथे एक एल आकाराचा सोफा आणून ठेवा. त्यावर चांगल्या कुशनचा एक सेट आणून ठेवा आणि जवळच्या एका टीपॉयवर छोटा फ्लॉवरपॉट ठेवा, त्यामुळे चांगली आरामदायी जागा तयार होईल.काही वेळा जागा इतकी कमी असते की तिथे काय करावं ते सुचत नाही.

अशा वेळी दोन- तीन लेव्हल असलेलं एक साईड टेबल घ्या. त्यावर फ्लॉवरपॉट किंवा फोटो फ्रेम किंवा एखादा डेकोरेटिव्ह पीस ठेवा आणि त्यावर चांगला प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा. थोड्याशा उपायांनीही हा कोपरा अगदी जिवंत होऊ शकतो. मुलांच्या खोलीत कोपऱ्यात त्यांच्या खेळासाठी जागा तयार करा किंवा दोन वीन बॅग टाकून त्यांच्या आरामाची सोय करा. एखादा नोटीस बोर्ड लावून त्यावर मुलांनी केलेले आर्ट अँड क्राफ्ट चिकटवा. बघता बघता त्यांचा एक वेगळा कोपरा सजेल.

कल्पना अनेक आहेत. जागा आणि त्याचा उपयोग कसा करता येईल याचा थोडा विचार केला तर घराचे कोपरे तुमच्या घराच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com