घरातील मोकळ्या Passageचा असा करा सुयोग्य वापर

पॅसेजचा जर सुयोग्य वापर करून घेता आला नाही तर पॅसेजच्या क्षेत्रफळा इतकी कार्पेट एरिया वाया तर जातेच, पण घरातली तेवढी जागा प्रत्यक्ष उपयोगात नसल्यामुळे घराचं उपयोगी क्षेत्रफळ एक प्रकारे कमी होतं
अशा सुधारा बांधकामातल्या त्रुटी
अशा सुधारा बांधकामातल्या त्रुटीEsakal

काही घरांमध्ये कधी कधी वास्तुरचनेतील Architectural त्रुटींमुळे बरीच जागा पॅसेजच्या रूपाने वाया गेलेली असते. घरात Home वावरायला मोकळी जागा हवी, हे जरी खरं असलं, तरी ती पॅसेजच्या Passge स्वरूपात शक्यतो नसावी. House Tips In Marathi Use Your Home Space Wisely

कारण पॅसेजचा जर सुयोग्य वापर करून घेता आला नाही तर पॅसेजच्या क्षेत्रफळा इतकी कार्पेट एरिया Carpet Area वाया तर जातेच, पण घरातली तेवढी जागा प्रत्यक्ष उपयोगात नसल्यामुळे घराचं उपयोगी क्षेत्रफळ एक प्रकारे कमी होतं, म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रत्यक्ष वापरात असलेल्या घराचा Home आकार अर्थातच लहान होतो.

घराचा आराखडा
घराचा आराखडाEsakal

अशाच प्रकारचं एक घर वर दिलेल्या आराखड्यात दाखवलं आहे. यात मुख्य प्रश्न होता तो १२ फूट x ५ फूट आकाराच्या पॅसेजचं काय करायचं, याचा. याबरोबरच त्या घरातल्या मुलाच्या अभ्यासासाठी सोय करून हवी होती. शिवाय चार माणसांसाठी असलेलं डायनिंग टेबल हवं होतं आणि शक्य झालं तर ते लिव्हिंग रूममध्ये असावं, अशी या घरच्यांची इच्छा होती. पण त्याचबरोबर हवी तेव्हा डायनिंग टेबलची प्रायव्हसी जपली जाणंही आवश्यक होतं.

वॉशिंग मशिनसाठीही जागा हवी होती. या घरात पुस्तकांचा साठाही बराच आहे. त्याकरताही जागा हवी होती. त्या दृष्टीने स्वयंपाकघर आणि लिव्हिंग रूम यांच्या मधली भिंत काढून टाकली. स्वयंपाकघराचा मूळचा आकार १२ फूट x १२ फूट इतका होता. त्यामुळे सध्या जिथे देवघर आहे, तिथेच ही भिंत देवघरामागच्या भिंतीला काटकोनात येत होती. ही भिंत काढल्यामुळे आराखड्यात दाखवल्याप्रमाणे डायनिंग टेबल ठेवण्यासाठी जागा तर झालीच, पण त्या एकत्रित केलेल्या खोलीला एक प्रकारचा प्रशस्तपणाही आला आहे.

सोफा आणि डायनिंग टेबल यांच्यामध्ये पडदा लावता येईल. त्यासाठी स्टेनलेस स्टीलचे दोन उभे रॉड किंवा खांब जमिनीत थोडेसे पुरून बसवता येतील. त्यांना पडद्यासाठी एक आडवा बारीक रॉड बसवून घेता येईल. त्यावर पडदा लावला की कोणी अनोळखी पाहुणे आले असतानासुद्धा पडदा सरकवून डायनिंग टेबलवर जेवायला किंवा नाश्ता करायला बसता येईल. पाहुणे नसतील तेव्हा पडदा एका बाजूला सरकवून ठेवला की खोलीत हवा, उजेडही भरपूर येईल आणि जेवताना टेबलावर बसून टीव्हीसुद्धा पाहता येईल.

डायनिंग टेबलशेजारी ओट्यासमोरच्या भिंतीपाशी फ्रिज ठेवला आहे. ओट्याशेजारी देवघर पूर्व-पश्चिम दिशेत आहे. बेडरूममध्ये बेड पूर्व-पश्चिम ठेवला आहे. त्याच्या बाजूला बेडरूमच्या प्रवेशद्वाराशेजारी ड्रेसिंग टेबल ठेवलं आहे. खोलीच्या उत्तर भिंतीपाशी वॉर्डरोब करून घेतला आहे. त्यात कपडे, मुलाच्या शाळेची बॅग, तसंच तिजोरीसाठी कप्पे करून घेता येतील.

हे देखिल वाचा-

अशा सुधारा बांधकामातल्या त्रुटी
Home Loan Tips: गृहकर्ज घेताय! या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

बाल्कनी ११ फूट x ४ फूट असल्यामुळे तिथेच मुलाच्या अभ्यासासाठी टेबल-खुर्ची ठेवली आहे. मधला पॅसेज बराच मोठा असल्यामुळे त्यात ८ फूट x २ फूट आकाराचं कपाट जर करून घेतलं, तर त्यात पुस्तकं आणि इतर सामान राहू शकेल. हे कपाट ठेवूनही तीन फुटांचा पॅसेज उरणार आहे. त्यामुळे वावरायला पुरेशी जागा असेल.

या कपाटाच्या बाजूला वॉशिंग मशिन ठेवता येईल. अशा प्रकारे घरातल्या पॅसेजचा सदुपयोग करून घेता येईल. तसेच जी भिंत धोकादायक नाही, अशी एखादी भिंत काढली, तर घर मोकळं आणि प्रशस्त होऊन त्या जागेचाही वापर करून घेता येईल. मात्र, असे बदल हे केवळ सिव्हिल इंजिनिअरच्या सल्ल्यानेच करावेत. कारण असे बदल केवळ फ्रेम्ड स्ट्रक्चर या प्रकारात करता येऊ शकतात.

लोड बेअरिंग प्रकारच्या रचनेत स्लॅबचा भार थेट भिंतींवर येत असल्यामुळे भिंतींची तोडफोड तर सोडाच, पण भिंतींना कुठेही धक्काही लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. काही इमारतींमध्ये मिश्र प्रकारची रचनाही असू शकते. तसंच इमारतीचं वयही असे बदल करताना लक्षात घ्यावं लागतं. अन्यथा मुळातच जुन्या झालेल्या इमारतीत तोडफोड केली, तर ती अधिकच क्षीण होऊ शकते किंवा तिच्या अस्तित्वालाही धोका पोचू शकतो.

नवीन बांधकामाच्या साइटवर जर आपण पाहिले असेल, तर आर्किटेक्ट वेगळा असतो आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर वेगळा असतो. आर्किटेक्टचे काम हे इमारतीच्या सौंदर्याची जपणूक करणे आणि बांधकाम होत असताना ते बांधकाम स्थानिक नगरपालिकेच्या बांधकामाविषयीच्या नियमांचे पालन करून होते आहे किंवा नाही, हे पाहणे आवश्यक असते.

तर इमारतीमधील बीम, कॉलम, स्लॅटॅब यासारख्या महत्त्वाच्या भागांची मापे किती असावी, त्यात किती व कुठल्या आकाराच्या सळ्या असाव्या, याविषयी स्ट्रक्चरल इंजिनिअर काळजी घेत असतो. म्हणजेच एक प्रकारे इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेची जबाबदारी ही इंजिनिअरचीच असते. म्हणूनच इंटिरिअर डिझायनिंग करून घेताना केवळ सौंदर्यावर भर न देता इमारतीची सुरक्षा पाहण्यासाठी इंजिनिअरचे मत घेऊनच नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com