घरातील Negativity दूर करायचीय मग या Vastu Tips तुमच्यासाठी

अनेकदा घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात कटुता निर्माण करते. बऱ्याचदा यामुळे नैराश्य येत. कामान लक्ष न दिल्याने तिथेही अपयश पदरी पडतं
नकारात्मकता करा दूर
नकारात्मकता करा दूरEsakal

अनेकदा आपण आयुष्यात सकारात्मक राहण्याचा खूप प्रयत्न करतो. मेहनतीने आणि प्रामाणिकपणे रोजची काम करतो.  मात्र त्यानंतरही अनेकदा घरातील वातावरण किंवा घरातील ऊर्जा Energy आपल्यात नकारात्मकता निर्माण करत राहते. Marathi Vastu Tips for Positive energy in home

यामुळे घरातील सदस्यांमध्ये तसचं रोजच्या आणि महत्वाच्या कामांमध्ये सतत अडचणी येत राहतात. परिणामी घरामध्ये ताण Tensions वाढत जातो. यातून वादांना तोंड फुटतं. परिणामी घरात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नकारात्मकता Negativity अधिक वाढू लागते. Vastu tips for positivity 

अनेकदा घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात कटुता निर्माण करते. बऱ्याचदा यामुळे नैराश्य येत. कामान लक्ष न दिल्याने तिथेही अपयश पदरी पडतं. आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागल्यास एक नव्हे तर अनेक समस्या निर्माण होवू लागतात. त्यामुळे वेळीच ही नकारात्मकता दूर करणं गरजेचं असतं. 

घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करणं किंवा काढून टाकणं म्हणजेच घरात सकारात्मक ऊर्जा तयार करणं. यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे घरात सकारात्मकता वाढण्यास मदत होईल. useful vastu tips

हे देखिल वाचा-

नकारात्मकता करा दूर
Kitchen Astro Tips: किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का? काय आहेत त्यांचे नियम

सूर्य प्रकाश आणि ताजी हवा- वास्तू शास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त अंधार असू नये. यासाठी घरातील खिडक्या आणि दारं उघड्या ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून घरात पुरेसा सुर्यप्रकाश येईल त्याचसोबत घरात हवा देखील खेळती राहिल. 

घरातील विषारी पदार्थ तसचं नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जावी यासाठी घराच्या खिडक्या उघड्या ठेवणं हा उत्तम पर्याय आहे. तसचं घरात ताजी हवा येणं गरजेचं आहे. सुर्याच्या नैसर्गिक प्रकाशामुळे नैराश्याची लक्षण कमी होतात आणि घरातील सदस्यांचा मूड चांगला होतो. Vastu Tips For happiness

तुटलेल्या वस्तू- वास्तू शास्त्रानुसार घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरातील नकारात्मकता वाढवतात. यातही खासकरून घरातील इलेक्ट्रॉनिक सामान अधिक नकारात्मकता वाढवतं. म्हणूनच जर तुमच्या घरातही तुटलेलं फर्निचर, घड्याळं किंवा इलेक्ट्रीक वस्तू असतील तर आजच त्या घराबाहेर काढा. 

जर या वस्तू वापरण्या योग्य असतील तर त्या लगेचच दुरूस्त करा. बंद उपकरणं घरात ठेवू नका. 

 घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा- वास्तू शास्त्रानुसार जर घरातील वस्चू सर्वत्र पसरल्या असतील तर घरातील सदस्यांमध्ये चिडचिड आणि नकारात्मकता वाढते. यामुळे घरातील वातावरणात तणाव वाढतो आणि सकारात्मकता कमी होवू लागते. 

यासाठी घरातील बिनकामाच्या वस्तू काढून टाकून घर व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या वस्तू वापरत नसाल त्या एखाद्या गरजु व्यक्तीला दान करा. तसचं तुमची खोली कायम स्वच्छ ठेवा. यामुळे घर प्रसन्न राहिल आणि सकारात्मकता वाढेल. Vastu tips for positive energy in house

हे देखिल वाचा-

नकारात्मकता करा दूर
Vastu Tips For New Home : फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी हे वास्तुदोष अवश्य तपासा

मिठाचा प्रयोग करा- वास्तू शास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचण्याचा गुण आहे. त्यामुळेच घरात मिठाचा वापर प्रभावी ठरतो. यासाठी घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये थोड मिठ टाकावं. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं. मात्र गुरुवारी हा प्रयोग करू नये.

तसचं एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये मिठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. जर तुमच्या घरातील वास्तूमध्ये एखादा दोष असेल तर तिथे एखाद्या भांड्यामध्ये मिठ ठेवा यामुळे घरातील वास्तू दोषही दूर होईल. 

वास्तू शास्त्रानुसार हे चार प्रयोग तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यास मदत करतील. यासोबत नियमितपणे घरात दिवाबत्ती करा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवासमोर दररोज तिन्ही सांजेला दिवा लावावा आणि प्रार्थना करावी. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहून सकारात्मक ऊर्जा आकर्षित होण्यास मदत होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com