
Vastu Tips : तुमच्या घरी 'या' पाच वस्तू असेल तरच हातात पैसा टिकेल
Vastu Tips : आपण ज्या घरी वास करतो ते घर नेहमी स्वच्छ सुंदर आणि पवित्र असायला हवं. स्वच्छ, सुंदर आणि पवित्र घरात नेहमी लक्ष्मी वास करते. अशा घरी सुख, शांती आणि नेहमी धनप्राप्ती होते. त्यामुळे देवस्थान असलेलं घराची विशेष काळजी घेणेही आवश्यक आहे.
घरात कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी नसायला हव्यात, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण अशा पाच वस्तूंबाबत जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक घरात असणे गरजेचे आहे. यामुळे घरात नेहमी लक्ष्मीची कृपा असते. चला तर जाणून घेऊया. (Vastu Tips if these five things are at your home lakshmi will show grace on you )
मातीचा घडा
ज्या घरात मातीचा घडा आहे त्या घरात वास्तुशास्त्रानुसार पैशांची कमतरता कधीही भासत नाही. घराच्या उत्तरेला पाण्याने भरलेला घडा ठेवल्यास धनप्राप्ती होते. घरात लक्ष्मी वास करते.
लक्ष्मी - कुबेराची मुर्ती
लक्ष्मी मातेला आणि कुबेर देवतेला धन आणि सुख समृद्धीचे प्रतिक मानले जाते. यासाठी घरात लक्ष्मी कुबेराची मुर्ती किंवा प्रतिमा असावी. घराच्या मुख्य दारावर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची प्रतिमा असणे शुभ मानले जाते
गंगाजल
गंगाजल हे सर्वात पवित्र जल मानले जाते. धार्मिक कार्यात आवर्जून गंगाजलचा उपयोग केला जातो. त्यामुळे गंगाजल असल्याने घरात नेहमी सुख संपत्ती लाभते.
मोपपंख
श्रीकृष्णाचं प्रतिक असलेलं मोरपंख घरी असणे खूप शुभ मानलं जातं. मोरपंखात भगवान श्रीकृष्णाचा अंश असतो. याशिवाय घरात मोरपंख असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा आणि सुख समृद्धी लाभते. पैशांची चणचण भासत नाही.
पंचमुखी हनुमानाची प्रतिमा
घरात हनुमानाची प्रतिमा असणे, शुभ मानले जाते. घरातील नकात्मता दुर पळते. हनुमानजी हे संकटमोचक आहेत. त्यामुळे घरातील संकटही दूर होते. त्यासाठी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा मूर्ती असावी.