टोळे या नोकरदार आहेत. त्यांच्या घरात त्यांची व पतीची अशा दोन दुचाकी आहेत. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चात गेल्या तीन महिन्यांत सुमारे 700 रुपयांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून रुजू असलेल्यांची पगार कपात झाली आहे. त्यात इंधनाचे दर वाढतच असल्याने बजेट सांभाळण्यातच त्यांची दमछाक होत आहे.
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आधीच आर्थिक चणचण आहे. त्यात सतत इंधनाचे दर वाढत असल्याने आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. त्यामुळे दुचाकी वापरणेही परवडत नाही. मात्र कोविड 19 चा विचार करता ही झळ सहन करावी लागत आहे, अशी स्थिती स्नेहा टोळे यांनी मांडली
टोळे या नोकरदार आहेत. त्यांच्या घरात त्यांची व पतीची अशा दोन दुचाकी आहेत. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चात गेल्या तीन महिन्यांत सुमारे 700 रुपयांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून रुजू असलेल्यांची पगार कपात झाली आहे. त्यात इंधनाचे दर वाढतच असल्याने बजेट सांभाळण्यातच त्यांची दमछाक होत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जूनमध्ये 78 रुपये लिटर असलेले पेट्रोल सोमवारी 90 रुपये झाले आहे. युरोपीय देशांत वाढलेली इंधनाची मागणी, कच्चा तेलाच्या बॅरलची किंमत 50 डॉलरच्या घरात गेल्याने आणि अनलॉकमध्ये वाहनांचा अचानक वाढलेला वापर यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. मात्र आनंदाची बाब म्हणजे येत्या 15 दिवसांत दर कमी होतील, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
डिझेल 80 च्या घरात
पेट्रोलचा भडका वाढत असताना डिझेल देखील त्यात कमी नाही. शहरात पेट्रोल नव्वदी पार गेले असून डिझेलही 80 रुपयांच्या घरात गेले आहे. सोमवारी डिझेलची किंमत 78.97 रुपये प्रतिलिटर होती. त्यामुळे ज्या घरांत पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधनाची वाहने नियमित वापरली जातात. त्यांना आणखी झळ सहन करावी लागत आहे.
पुण्याच्या कृष्णानं मोडला स्वत:चाच विक्रम; 200 फूट उंच 'सुळका' अवघ्या 15 मिनिटात सर
''वापरासाठी तयार असेलेले मोठ्या प्रमाणातील इंधन गेले काही दिवस बाजारात शिल्लक होते. त्यामुळे आखाती देशातील इंधनाच्या अनेक खाणी बंद होत्या. शिल्लक असलेले इंधन संपत आल्याने आता पुन्हा नवीन उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे मुबलक व तुलनेने कमी किमतीत इंधन पुढील 15 दिवसांत उपलब्ध होईल.''
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
सोमवारी शहरातील इंधनाचे दर
पेट्रोल - 90.00
डिझेल - 78.97
सीएनजी - 53.85