पुण्याच्या कृष्णानं मोडला स्वत:चाच विक्रम; 200 फूट उंच 'सुळका' अवघ्या 15 मिनिटात सर

Wazir Sulka Trek Completed in just fifteen minutes
Wazir Sulka Trek Completed in just fifteen minutes

खडकवासला(पुणे) : ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्यालगत असलेल्या दोनशे फूट उंच 'वजीर' सुळका सिंहगड-डोणजे येथील 23 वर्षाच्या कृष्णा मरगळे या युवा गिर्यारोहकाने अवघ्या पंधरा मिनिटात सर केला. 

घनदाट जंगल व खोल दऱ्यामुळे हा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य आहे. अनेक कठीण आव्हानांना तोंड देत एस एल एडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी पार पाडली. मोहिमेचे नेतृत्व लहू उघडे यांनी केले. तुषार दिघे, शंकर मरगळे यांचाही मोहिमेत सहभाग होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड, डोणजे येथील एस. एल. ऍडव्हेंचरचे लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेचे आयोजन केले होते. मोहीमेमध्ये तुषार दिघे, शंकर मरगळे, लहू उघडे यांनी देखील यशस्वीरित्या सहभाग नोंदवला. 

एस. एल.एडव्हेंचरचे गिर्यारोहक अशा नवनवीन मोहिमेमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी खडपारशी (वानरलिंगी), ड्युक्स नोज, तैलबैला, कळकराई, लिंगाणा, तानाजी कडा यासारख्या अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. अशा मोहिमांसाठी शिवाजी राजे क्लाइंबिंग वॉल आणि शिवदुर्ग लोणावळा यांचे सहकार्य मिळाले. 

सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो

 स्वतःच मोडला स्वतःचाच विक्रम 
सिंहगड येथील २३ वर्षांचा गिर्यारोहक कृष्णा मरगळे यांनी मागील वर्षी २० मिनिटामध्ये वजीर सुळका सर करून विक्रम केला होता. आता तोच सुळका अवघ्या १५:५० मिनिटांमध्ये सर करून वजीरवीर कृष्णाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 


सुळक्याला वजीर का म्हणतात?
वजीर हा ट्रेकिंगसाठी अत्यंत खडतर.  सुळक्याची उंची २०० फूट असून, माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून दोन हजार ८०० फूट आहे. बुद्धिबळातील वाजीरासारखा दिसणारा हा सुळका ठाणे जिल्यातील माहुली किल्यालगत आहे. चढाईसाठी अवघड असल्यामुळे गिर्यारोहकांसाठी हा सुळका नेहमीच खुणावत आकर्षित करतो.

लॉकडाउनच्या काळात गीर गाईच्या दुधाला दुप्पट मागणी वाढली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com