पुणे - ढोल-ताशाच्या गजरात, श्रींची सामूहिक आरती करीत, विविध क्षेत्रांतील नेतेमंडळींना आमंत्रणे देत अनेक मंडळांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत असून, मध्यवर्ती पेठांतील प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्याचा आनंद उत्सवाच्या सहाव्या दिवशी अनेक पुणेकरांसह परदेशी नागरिकांनीही घेतला. गणेशभक्तांनी पेठांही गजबजून गेल्या होत्या.

पुण्यनगरीचा गणेशोत्सव पाहायला आलेल्या परदेशी नागरिकांनी दिवसभर विविध पेठांतील मंडळांना भेटी दिल्या. तसेच, बाप्पांचा देखावा पाहिला. रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त देखावे पाहत होते. त्यामुळे संपूर्ण शहरातच रात्री उशिरापर्यंत उत्साहाचे वातावरण जाणवत होते. देखावे पाहायला नागरिक घराबाहेर पडल्याने मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी जाणवत होती. मात्र, त्या कोंडीचा त्रास वाहनचालकांच्या चेहऱ्यावर नव्हता. अनेक मंडळांचे देखावे पूर्ण झाले असल्याने, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारीदेखील मध्यवर्ती भागात गणेशभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे.