#BappaMorya ‘सोसायटी गणेशोत्सवा’तून आपुलकी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शनिवारी व्यक्त केली. ‘सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे’त गोंदकर हिने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा बुद्रुक येथील सोसायट्यांना भेट देऊन गणेशोत्सवाचा हा जल्लोष रहिवाशांबरोबरच्या सेल्फीत क्‍लिक केला.

पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शनिवारी व्यक्त केली. ‘सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे’त गोंदकर हिने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा बुद्रुक येथील सोसायट्यांना भेट देऊन गणेशोत्सवाचा हा जल्लोष रहिवाशांबरोबरच्या सेल्फीत क्‍लिक केला.

सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोसायटी गणेशोत्सव’ या स्पर्धात्मक उपक्रमाला जल्लोषात सुरवात झाली. या उपक्रमात गोंदकर प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाली. तिने विविध सोसायट्यांना भेट देत रहिवाशांशी संवाद साधला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्मिताने सोसायट्यांमधील गणपती सजावटीचे परीक्षण केले. 

पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत आनंद पार्क सोसायटी, यशोधन सोसायटी, लेक टाउन सोसायटी, अखिल मोहननगर सोसायटी आणि श्रीयश मित्रमंडळ सोसायटी यांनी भाग घेतला होता. या सोसायट्यांमधील गणपतीची आरती स्मिता गोंदकर हिच्या हस्ते करण्यात आली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि ‘सोनाटा गणेशोत्सव ॲप’ हे ‘सोसायटी गणेशोत्सव’  या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. 

आनंद पार्क सोसायटी 
शंकर शेठ रस्ता : स्मिताने उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी गणपती मंडळाचे सचिव प्रा. पंडितराव पाटील, ‘लोकमान्य’चे राजेंद्र शहा उपस्थित होते. 

यशोधन सोसायटी 
 कोंढवा बुद्रुक : स्मिताबरोबर फोटो काढण्याचा मोह तरुण-तरुणींसह महिलांनाही आवरला नाही. मंडळाच्या अध्यक्षा उषा ओस्वाल, ‘लोकमान्य’च्या मंजूषा सूर्यवंशी उपस्थित होत्या. 

लेक टाउन सोसायटी 
बिबवेवाडी : स्मिताने तिच्या बालपणीच्या गणपती उत्सवातील आठवणी सांगितल्या. सर्वांबरोबर एक सेल्फीही घेतला. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब ओस्वाल उपस्थित होते.

अखिल मोहननगर सोसायटी 
धनकवडी : ‘ऑन ड्यूटी २४ तास’ असा महिला पोलिसांवर आधारित असलेला देखावा प्रेरणादायी असल्याचे स्मिताने सांगितले. मंडळाचे कार्याध्यक्ष मयूर बुरसे, विजय राजपूत, किरण ऐनपुरे उपस्थित होते.

श्रीयश मित्र मंडळ मोहननगर 
धनकवडी : पर्यावरणपूरक गणपतीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मंडळाने दिला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष आशिष गावडे उपस्थित होते.

 गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात ‘सकाळ’ने सुरू केलेल्या या उपक्रमाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
- स्मिता गोंदकर, अभिनेत्री

‘सकाळ’ अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबवीत असते.  ‘सकाळ’च्या समाजहिताच्या उपक्रमाला आमचा नेहमीच पाठिंबा असतो.
- सुशील जाधव, विभागीय प्रमुख, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BappaMorya ganeshotsav Ganpati Smita Gondkar