पुण्यात विसर्जन मिरवणुकीतील उत्साह (व्हिडीओ)

टीम ई सकाळ
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची आज (मंगळवार) सांगता होत असून, पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथून आज सकाळी सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची आज (मंगळवार) सांगता होत असून, पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथून आज सकाळी सुरवात झाली. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती झाल्यावर विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली. मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. अब्दागिरी, मानचिन्हांसह, पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग, नयनमनोहर देखावे आणि सजलेले रथ, सनई चौघड्याचे मंजुळ स्वर, बॅंडच्या सुरावटी, ढोल-ताशाच्या थर्राराचा आनंद असे जल्लोषपूर्ण वातावरण आहे.

पुणे- चांदीच्या पालखीतून मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणुक सुरु..

पुणे- तांबडी जोगेश्वरी गणपती निघाला मिरवणूकीला...

बाप्पा सेलिब्रिटींचा.... 
पुण्यात कलावंत ढोलताशा पथक विसर्जन मिरवणुकीत सहभागी.... 
(व्हिडिओ- अरुण सुर्वे)

पुण्यातील गणपती मिरवणुकीत ढोलताशा, लेझिम आणि साहसी खेळाची प्रात्यक्षिके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: esakal news anant chatruthi Ganesh visarjan video pune