पुण्याचा मानाचा पहिला- कसबा गणपतीची थाटात प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे : पावसामुळे भाविकांची गर्दी तुलनेने कमी असल्याचे दिसून आले. कॅमेरा / स्मार्ट फोन्सची संख्या मात्र वाढलेली... मिरवणूक  सुरळीत सुरू राहिली. पुण्याचा मानाचा पहिला असणाऱ्या कसबा गणपतीची  प्रतिष्ठापनेसाठी निघालेली मिरवणूक पाहा.

भाऊसाहेब रंगारी गणपती मिरवणूक आणि दगडूशेठ याबद्दल भाविकांमध्ये मोठे उत्सुकता होती. दगडूशेठ गणपती रथात विराजमान झाल्यावर त्याची छबी टिपण्यासाठी अनेक स्मार्टफोन पुढे सरसावले. 

पुण्यातील भाऊ रंगारी गणपती 5 ढोलताशा पथकांच्या वादनापाठोपाठ आगमन झालं. त्यानंतर दगडूशेठ गणपतीची आरती संपली. श्रींची मूर्ती रथावर आणली गेली... बँडपथक वादनाचा जल्लोष सुरू झाला. मानिनी ढोलताशा पथकातील महिलांच्या वादनाने मिरवणूक सुरू झाली. दगडूशेठ अप्पा बळवंत चौकात पोचला. त्यापाठोपाठ भाऊसाहेब रंगारी गणपतीची पालखी दाखल झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh festival kasba ganpati