ओम गं गणपतये नमः 

ओम गं गणपतये नमः 

पुणे : शंखध्वनीच्या ओंकाराच्या ध्वनिलहरींनी दुमदुमलेला आसमंत... अन्‌ एकाच स्वरात हरीओम्‌ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी, त्वमेव केवलं कर्तासी... या अथर्वशीर्षाच्या ऋचा म्हणत आणि ओम गं गणपतये नमः या नाममंत्राचा सामूहिक जप, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, टाळ्या वाजवत प्रसन्न वातावरणात 31 हजार महिलांनी ऋषिपंचमीच्या सुमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या 'श्रीं'च्या समोर आपली सेवा वाहिली. 

भरजरी वस्त्रालंकारात आलेल्या या महिलांनी एकसुरात अथर्वशीर्ष म्हटले. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाने महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजिला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, देवीसिंह शेखावत, महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव उपस्थित होते. महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे यंदा 31 वे वर्ष आहे. 

पाटील म्हणाल्या, ''स्वातंत्र्यप्राप्तीसाठी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. महिलांमध्येही संघटनशक्ती आहे. त्यामुळेच महिलांना समाजात समान अधिकार मिळायला पाहिजेत. सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून महिलांनी संघटनशक्तीचे दर्शन घडविले आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com